आयोजक तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सिफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमी नोंद झाल्याबद्दल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
अष्टपैलू व्यक्तिमत्व अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांचा गौरव समारंभ सामाजिक कार्यकर्ते व हजारो गोरगरीब रुग्णांना आधार देणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सोनू डगवाले यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत रविवार, दिनांक 23 जुन 2024 रोजी सकाळी 11 वाजता बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला आहे.
नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई व मनोहरी अंबानगरी कलाकार कट्टा यांच्या तर्फे केला असल्याची माहिती आयोजक तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, जेष्ठ पत्रकार दत्ताजी अंबेकर, मराठी पत्रकार परीषद, अंबाजोगाईचे अध्यक्ष प्रशांत लाटकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तरी भूमिपुत्राच्या या कौतुक सोहळ्यास व सत्कार सोहळ्यास तमाम अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
=======================