गूळ शुगर फ्री असल्याची पाटील यांची खात्री

देवणी : कुमार पाटील यांनी धनेगाव येथे सेंद्रिय शेती करून रासायनिक खतांना हद्दपार केले आहे संभाव्य जीवनाचा धोका टाळून सेंद्रिय खतांच्या माध्यमातून निर्माण केलेले गुळासासारखे उत्पादन बिनधास्त खा निरोगी जीवन जगत रहा असा संदेश देत सेंद्रिय खतांचा वापर करून गूळ उत्पादन करून शुगर असलेल्या लोकांना मोठा दिलासा दिला आहे
अस्सल गोडीच्या सर्व वाटा येथेच येऊन थांबतात जेथे सेंद्रिय शेतीच्या परंमपरेने उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्माण केली जातात असं विश्वसनीय नाव म्हणजे कुमार पाटील यांचे धनेगाव येथील महादेव ऍग्रो फुड्स हे होय
रासायनिक केमिकल युक्त खतांच्या माध्यमातून उत्पादन झालेल्या अन्न धान्य खाल्यामुळे अख्खा देश विविध प्रकारच्या अनेक रोगाने व व्याधीने ग्रासला असून यामुळे माणसाचे आयुर्मान खूपच कमी झाले आहे प्रत्येक मनुष्य घासाघासातून रासायनिक खतांच्या माध्यमातून पिकविलेले अन्न धान्य मोठ्या प्रमाणात खात असल्याने अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे रासायनिक खतांमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात आहे याला कारणीभूत वाढती लोकसंख्या ही आहे लोकसंख्याच्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन वाढणे तितकेच महत्त्वाचे असले तरी एका दृष्टीने माणसाच्या जीवनाशी खेळणे तितकेच धोकादायक आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्ञात असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर केला जात आहे यांना कारणीभूत नेमके कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वीच्या काळात देशाची लोकसंख्या कमी असल्यामुळे खेड्यातील सर्व गरजा खेड्यात पूर्व होयाच्या खेड्यातील बारा बलुतेदार आपापली भूमिका योग्य प्रकारे बजावत होते त्यामुळे खेडी स्वयंपूर्ण होती जिव्हाळा आपुलकी प्रेम या सर्वच गोष्टी खेड्यात दिसायला मिळत म्हणून गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला असावा या रासायनिक खतांमुळे होणारे दूषपरिणाम कुमार पाटील यांनी वेळीच ओळखले आणि रासायनिक खतांमुळे जाणारे बळी सामाजिक बांधिलकी म्हणून आपणाला रोखता येतील का यासाठी आठ दहा वर्षांपासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली अनेक दिवसांपासून रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा आपल्या शेतातील अंश कमी करण्यासाठी आज दहा वर्षे सेंद्रिय खताचा वापर करून शेती सुपीक व सेंद्रिय शेती करण्यासाठी लायक बनविली आहे आज त्याच शेतीतून सेंद्रिय खतांचा माध्यमातून निर्माण केलेले उत्पादन शंभर टक्के शुद्ध निर्माण होत आहे म्हणतात ना पेरलं तेच उगवत शुद्ध खा आणि निरोगी रहा असा संदेश कुमार पाटील यांनी दिला आहे सर्वसामान्य लोकांना देऊन त्यांना दिलासा दिला आहे म्हणून कुमार पाटील यांनी उत्पादन केलेल्या गुळाला आता परदेशात मागणी होत आहे
अशा सेंद्रिय पद्धतीने निर्माण केलेल्या महादेव ऍग्रो फूड्स या फार्मला अवश्य भेट द्या खात्री करा आसे आवाहन प्रगतशील शेतकरी कुमार पाटील धनेगावकर यांनी केले आहे.