शेतकरी नेते राजकुमार सस्तापुरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
देवणी / प्रतिनिधी : सद्या खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव हे आधारभुत किंमती पेक्षा खाली आले आहेत किमान हामी भाव हे 4600 व बाजारात 4000 रु म्हनजे प्रती किं. 600 ते 700 रु चा फरक आहे व रोजच्या रोज सोयाबिनच्या भावात घसरन होतच आहे त्यामुळे सोयाबीनला भावानंतर योजना लागु करुन प्रती किं. सरसगट एक हजार रुपय मदत जाहीर करवी
केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षापासुन खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे आकरा हाजाराला गेलेला सोयाबीनचा भाव आज चार हजारवर आला आहे या भावाने सोयाबीन विकले तर काढणीचा खर्च सुध्दा भरुन निघत नाही आशी परस्थिती आहे,
सोयाबीन हे शेतकर्याचे नगदी पिक आसुन त्यावरच शेतकर्याचे वार्षीक आर्थिक बजेट आंवलंबुन आसते म्हनुन शेतकर्यानी बाजारभाव वाढतील या आशने गेल्या तिन वर्षापासुन सोयाबीन बाजारात विक्रीला न आनता घरी ठेवुन सावकाराकडुन व्याजी पैसे काडुन आपला अर्थिक व्यव्हार चालवतो आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे,
तरी मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातील शेतकर्याना सोयाबीन च्या बाजार भावाच्या अर्थिक संकटात भावानंतर योजना लागु करुन सरसगट प्रती किंव्टल एक हजार रूपय मदत जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे.