सोरगा गावच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिक क्रांती व कोरो इंडियाच्या वतीने बैठक संपन्न
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
जळकोट तालुक्यातील सोरगा या सर्व सुविधां पासुन वंचित आसलेल्या गावात श्रमिक क्रांती आभियान महाराष्ट्र, व कोरो इंडिया या सामाजिक संस्थेने प्रवेश केला आसून तेथील समस्या जाणुन घेऊन त्या सोडविण्या कामी महिलांची बैठक घेण्यात आली, सोरगा गावात…….पन्नास घरांची वस्ती आसुन गाव तसे नावालच आसल्याची माहिती उपस्थीत महिलांनी संस्था संघटनेला दिली आहे,या गावात पोलिस पाटील वडगावचा देण्यात आले आसुन रेशन दुकान शेलधरा हे आहे,हे गाव आहमदपुर तालुक्यातल्या हंगरगा ग्राम.पंचायतीला जोडलेले आसुन तहसिल मात्र जळकोट तालुक्यात आहे,ग्रामसभा तर आम्हाला माहीतच नाही आशी ही माहीती यावेळी उपस्थीतांनी दिली बॅंक शेलधरा आहे,तर गावात फक्त पाचवी पर्यंतच शाळा आहे,त्या शाळेला कंपाउंड नाही,शाळेच्या पाठभिंतीला नाला आहे आणि त्या नाल्यातुन शाळेत साप येण्याच्या घटना ही घडत आहेत आशी ही माहीती उपस्थीत महिला पुरुषांनी यावेळी दिली आणि विशेष म्हणजे या गावला एस. टी.नाही.आणि सरकारी दवाखाना तर नाहीच नाही परंतु खाजगी ही नाही आशी ही खंत उपस्थीत महिलांनी या बैठकीत व्यक्त केले,सदर प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही सज्ज आसावे तुमच्या बरोबरीने संस्था संघटना ही हे प्रश्न सोडवणुकीचे प्रयत्न चालविल आशी ग्वाही संघटनेच्या आनिता गायकवाड दिली आहे,विधवा निराधारांचे प्रश्न सोडविण्याचा संघटनेचा कटाक्ष आसुन त्या बरोबरीने इतरही प्रश्न सोडविण्यास संघटना बांधील आहे,आसे वक्तव्य संघटनेचे आध्यक्ष मारुती गुंडीले यांनी ही यावेळी केले सदरचे या बैठकीस संघटनेचे प्रमुख मारुती गुंडीले सह संघटनेच्या जळकोट ता.महिला आघाडी कार्यकर्त्या आनिता गायकवाड दयानंद गायकवाड,माधव काळे,इत्यादी सह गावातील शिवाजी सोरगेकर,दत्ता यादव, विश्वनाथ सोरगेकर,उत्तम आनकाडे,आशाबाई पवार,शकुंतला गव्हाणे,मिराबाई सोनकांबळे, सुरेखा सोनकांबळे इत्यादी महिला पुरुष ही यावेळी उपस्थीत होते.