DRP यांनी प्रकल्प स्थळावर कडल्या जाणाऱ्या फोटो विषयी थोडी माहिती –

डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन (DRP) यांची एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे अर्जदाराच्या प्रकल्प स्थळाला भेट देणे आणि DLC साठी प्रकल्पाची शिफारस करताना अर्जदारासोबतच्या फोटोसह आवश्यक छायाचित्रे अपलोड करणे.

DRP ने प्रकल्प स्थळाला भेट देण्याची कारणे:

  1. जागेच्या पत्ता पडताळणी:
  • अर्जदाराने दिलेला जागेच्या पत्त्याचा पुरावा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष स्थळाशी जुळत आहे का, जागा सांगितल्या प्रमाणे मालकी / भडे तत्त्वावर आहे याची खात्री करणे.
  1. उपलब्ध जागेची तपासणी:
  • प्रकल्पासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का, आणि प्रस्तावित मशीनरी तिथे बसवता येईल का, याची पाहणी करणे.
  1. मूलभूत सुविधा तपासणे:
  • प्रकल्पस्थळी वीज व पाण्याची उपलब्धता आहे का, तसेच मशीनरीसाठी आवश्यक सिंगल किंवा तीन फेज वीज पुरवठा आहे का, याची खात्री करणे.
  1. फोटो अपलोड करणे:
  • किमान तीन फोटो घेणे असावेत:
    • अर्जदारासोबत प्रकल्प स्थळावरचा एक फोटो.
    • प्रकल्पाच्या स्थळावरील प्रस्तावित मशीनरी बसवन्यात येणाऱ्या रिकाम्या जागेचे दोन फोटो.
      यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्ज मंजूर करत असताना मदत होऊन प्रकल्पास सकारात्मक बाजूने पहिल्या जाते.
  1. योग्य ठिकाणी फोटो काढणे:
  • फोटो DRP च्या कार्यालयात किंवा अर्जदाराच्या घरात काढू नयेत. फोटो फक्त प्रकल्प स्थळावरच काढणे बंधनकारक आहे.

वरील बाबींचे निराकरण करण्यासाठी DRP यांनी प्रकल्प स्थळासंबंधीचे सर्व तपशील अचूक आणि पारदर्शकपणे नोंदवणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp