भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करा सपोनि माणिकराव डोके

देवणी / प्रतिनिधी ( लक्ष्मण रणदिवे ) :आगामी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत दि २९ऑक्टोबर २०२४ रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३०ऑक्टोबर रोजी अर्ज पडताळणी होणार आहे व अर्ज परत घेण्याची शेवटची ताररीख ४ नोव्हेंबर ही आहे. मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागलीच मतमोजणी होणार आहे. त्या संदर्भात भारतीय राज्यघटनेच्या अधिन राहून भारतीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता घालून दिली आहे. एक भारताचा सुज्ञ नागरिक म्हणून या आदर्श आचार संहितेचे पालन केले पाहिजे असे मत देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी माध्यमाशी बोलतांना व्यक्त केले.

     सविस्तर माहिती अशी की भारतात भारतीय निवडणूक आयोगाची आचारसंहिता अथवा निवडणुकीची आदर्श आचार संहिता किंवा सामान्यपणे त्यास निवडणुकीची आचार संहिता असेही म्हणतात ही निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून त्या त्या मतदारसंघात निवडणूक घोषित होताच निवडणूक आचारसंहिता लागू केली जाते त्या संबंधित निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता लागू असते या आचार संहितेत विविध राजकीय पक्षाने या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराने कशा प्रकारची वर्तुणूक ठेवायची यांचे सविस्तर माहिती विवरण म्हणजे आचारसंहिता आहे या आचार संहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांना तसेच उमेदवारासह सर्व भारतीयांना बंधनकारक असल्याचेही पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी सांगितले निवडणुकीत सहभागी असलेल्या मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या अपक्ष किंवा स्वातंत्र उमेदवारांनी भाषण किंवा निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर निवडणूकीचा जाहीरनामा, किंवा मिरवणूक, प्रचार घोषणा, सर्वसामान्य व्यवहार यांत काही मर्यादा पाळाव्या लागतात निवडणुका मुक्त व खुल्या योग्य वातावरणात पार पाडाव्या त्यात काही जातीय तेढ निर्माण होऊ जातीय दंगली घडू नये यामुळे काहीअनुचित गैरप्रकार होऊ नये म्हणून आदर्श आचारसंहिता घालून दिली आहे ही आचारसंहिता नीट पाळली जाते की नाही यावर संबंधित निवडणूक अधिकाऱ्याची देखरेख तर असते या बाबदचा अहवाल संबंधित निवडणूक अधिकारी राज्यनिवडणूक आयोग किंवा भारतीय निवडणूक आयोग यांच्याकडे पाठविले जाते या निवडणूक संदर्भात कोणी गैरप्रकार केल्यास कडक कार्यवाई केली जाते त्यामुळे कायदा कोणीही हातात घेऊ नये नियमाचे पालन करून निवडणुकीला सामोरे जावे या बाबद पोलीस प्रशासनाची निवडणूक कार्यक्रम यांच्यावर करडी नजर राहणार आहे या विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून निवडणुकीत कोणी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कायद्याने कडक कार्यवाई केली जाईल निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आदर्श आचार संहितेचे पालन करा असे आवाहन पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp