मुखेड / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील आनूसुचित जातीपैकी एक आसलेला होलार समाज मोठ्या प्रमाणावर राज्यभर विखूरलेला आसून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होलार समाजाच्या मतदानाचा वापर करून भारतीय संविधानाची शपथ घेणारे मंत्री, खासदार, आमदार या समाजाला कधी विचारात घेतले नाहीत किंबहुना स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे लोटली तरीही या समाजाला न्याय मिळाला नाही तर लोकशाहित कायम वंचितच राहिला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त होलार समाजाचा वापर करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आसल्याचे सुतोवाच होलार समाजाच्या चिंतन बैठकी दरम्यान राष्ट्रीय होलार समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी टाळीकोटे शिरूरकर यांनी केले आहे.

निवडणूका येतात तेंव्हा मात्र होलार समाजाची आठवण येते परंतु समाज राजकीय द्रष्ट्या सक्षम न झाल्याने कोणीही येतो टिकली मारून जातो आशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे. ती मरगळ दूर करून राज्यातील होलार समाजाला स्वातंत्र्य, समता,बंधूता व न्याय आधारित लोकशाही देणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरच चालण्यासाठी त्यांनी दिलेली शिकवण म्हणजे शिका..संघटीत व्हा आणी संघर्ष करा या निती प्रमाणे भारताच्या सर्वोच्च ग्रंथाला म्हणजेच भारतीय संविधानाला प्रमाण माणून होलार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या द्रष्टीने स्वताचे आस्तित्व निर्माण करण्यासाठी राज्यभर जनांदोलन निर्माण करत प्रगल्भ समाज उभा करणे आवश्यक आहे यासाठी होलार समाजातील हेवेदावे ,गर्व,मोठेपणा बाजूला सारून शिकल्या-सवरल्यांनी,करत्या-धर्त्यांनी,विचावंतानी सामाजिक भान ठेवत आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून समाजाप्रती झोकून दिले पाहिजे आशी कळकळ सुद्धा व्यक्त केली आहे.

प्रत्येक निवडणुकीत होलार समाजातील युवकांना ईतर जातीतील गावलेवलचे लूचे पुढारी होलार समाजातील हिन-दीन झालेल्या युवकांना दाखवून मलीदा लाटण्याचे काम सर्रास होताना दिसत आहे. याचे कारण आपल्या धडावरील डोक्यात मेंदू स्वताचा नसून तो मेंदू दलाल भडव्यांकडे गहाण ठेवल्या जात आहे. म्हणून प्रत्येक निवडणुकीत दारू पाजवून आपले मत घेतल्या जात आहे तीच फुकटात भेटलेली दारू कायमची व्यसनात रूपांतर होते आहे. याचाच परिणाम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग व्यसनाधीन होऊन आखं कुटुंब बर्बाद करीत आहे. हि बाब अत्यंत गंभीर आसून समाजातील सदसद्विवेकबुद्धी आसणाऱ्यांनी वेळीच जागे होणे गरजेचे आहे. अन्यथा होलार समाज संपल्या शिवाय राहणार नाही. ज्वलंत खंत बोलून दाखवली.

दिवसेंदिवस समाजावर होणारे अन्याय, राजकीय पुढाऱ्यांनी जाणीवपूर्वक करीत आसलेले दुर्लक्ष या बाबी लक्षात घेऊन मतदान कुणाला आणी का? केले पाहिजे यावर मंथन झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत अकार्यक्षम व होलार समाज हित न पाहणाऱ्या उमेदवारांना मत न देता संविधानाच्या माध्यमातून निवडणूक निर्वाचन आयोगाने दिलेल्या पर्यायापैकी “नोटा” चे बटन दाबून आपली खदखदत व्यक्त करणे ही खऱ्या लोकशाहीचे प्रमाण आहे.आणि म्हणूनच निवडून येणारा उमेदवार तेवढ्याच मताने जेंव्हा पडेल तेंव्हा त्याची जागा त्याला दिसेल..!! या साठी सदर निवडणुकीत होलार समाजाच्या जबाबदार व्यक्तीनी सर्व सामान्य समाज बांधवांना बारकाईने समजावून सांगणे एक सामाजिक कार्य आहे. या चळवळीचा एक हिस्सा म्हणून आपल्याकडे जबाबदारी सुपुर्द करीत आसल्याचे बालाजी टाळीकोटे शिरूरकर आपल्या कार्यकर्त्यांना चिंतन बैठकीला संबोधीत करताना सांगितले.

या वेळी होलार समाजाचे जेष्ठ नेते नामदेवराव जाहगीरदार,सखाराम खांडेकर,दशरथराव टाळकुटे ईस्मालपूरकर,मुकेश होनमाने, उत्तमराव ताळीकोटे,मनोहर जाहिरे,शालबा टाळीकोटे, राजेंद्र देवकत्ते,नामदेव टाळीकोटे,दत्ता टाळीकोटे,आदी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp