
लातूर / प्रतिनिधी : सामाजिक न्याय भवन लातुर येथे आज दि.२१/१/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) ,व जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती लातुर व महसुल विभागाच्या वतीने लातुर येथे होलार समाजासाठी एक दिवशीय विभागीय कार्यशाळा शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे बार्टीचे उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी वरील उदगार काढले ते बोलताना पुढे म्हणाले,” होलार समाज दुर्लक्षित असा समाज आहे या समाजात शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे…. समाजाच्या जातप्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्रासाठी होलार समाजाला ज्या अडचणी येतात त्या प्रामुख्याने सोडविल्या जातील
यावेळी लातुर जातपडताळणी विभागाचे प्रमुख तेजस माळवदकर यांनीही सखोल मार्गदर्शन करुन समाजाला जात पडताळणीतील अडचणी दुर केल्या जातील असे आश्वासन दिले
यावेळी होलार समाज चळवळीचे अभ्यासक लेखक, साहित्यिक प्रा. वैजनाथ सुरनर यांनी लातुर, नांदेड, धाराशिव, जिल्ह्यातील समाजाला जातप्रमाणपत्र व पडताळणी साठी येणाऱ्या अडचणी सविस्तर अभ्यास पुर्ण मांडल्या
कार्यक्रमाचे प्रस्ताविक होलार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव ऐवळे व नितीन सहारे यांनी केले तर आभार रामचंद्र वंगाटे यांनी मानले….
राजकुमार यळगे, पत्रकार बालाजी टाळीकोटे,बालाजी नामदास, नामदेवराव ऐवळे यांनी समाजाच्या व्यथा व अडचणी प्रश्नरुपाने मांडल्या
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महावीर ऐवळे, सर्जेराव टाळकुटे,बालाजी टाळीकोटे,पंडीत कांबळे,बालाजी नामदास, अविनाश ऐवळे, प्रकाश टाळकुटे, शिवदास होणमाने, विकास आयवळे, बालाजी केंगार , सचिन जावीर,अमोल टाळकुटे,अक्षय जावीर, महेश जावीर, विशाल ऐवळे, विष्णू गुळवे, तसेच सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी,समता दुत हजर होते




