*सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-*

मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले.

मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.

शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ.“अभ्यासक्रम नियोजन” हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो.

सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.

शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.

शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक.राज्य सरकारने “आनंददायी शिक्षण”ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे.

त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती.

त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते.

त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीबाई व जोतिबा यांना जाते.

पुणे व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका.

विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिका.

सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण-तज्ञ. त्यासाठी वेताळ-पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली. पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या.

शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.

गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे हा उपक्रम राबवीत आहे.

प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका.

विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक. विकसित देशांत शाळाशाळांत समुपदेशक असणे आवश्यक आहे.

सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य.

विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य.

फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते.शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या.

सावित्रीबाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो.

मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो.

आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या.

आधुनिक काव्याच्या जनक. (केशवसुतांच्या सुमारे ४० वर्षे आधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जनसामन्यांच्या विविध विषयांवर कवितांचे लेखन.) ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.

खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या सामाजिक नेता.

अस्पृश्यांना स्वत:च्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य.

वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी “बालहत्या-प्रतिबंधक-गृह” सुरु करून चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता.

फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते. हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता. त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते.

विधवा पुनर्विवाह सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक.

विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनौरस मुलगा दत्तक घेतला. परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.

आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाज सुधारक. स्वत:च्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता.

हुंडाविरहित सामुहिक विवाहाच्या प्रवर्तक.

रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तीळ-गुळासारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती-निर्मूलक.

मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका. महात्मा फुले यांची भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली.

विधवांच्या केशवपन (टक्कल करणे) विरोधात न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. हा भारतातील पहिला यशस्वी संप होता.

त्या प्रभावी वक्ता होत्या. सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांनी बरीच भाषणे दिली होती.

पतीच्या अंत्ययात्रेत स्वत: टिटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.

पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
 
सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष.

१८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणार्याय बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.

१८९६ साली दुष्काळात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखी दुष्काळी कामे सरकाराला सुरु करण्यास भाग पाडले.
 
१८७६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. १८९६ च्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली.

बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी.

भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या.

💫संदर्भ:- “सावित्रीमाई कोण होत्या?”*😔एक खंत आजही सतावते की,या फुले दांपत्यांना आजही शासन कर्त्यांनी उपेक्षीतच ठेवले आहे,भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न"आजही या दांपत्यापासून दुरच का?.....किमान त्यांच्या कार्याची उतराई होण्याचे भाग्य आमच्या पिढीला मिळणार का?.....त्यांचे कार्य सत्कारणी तर लागले पण , त्यांच्या पश्चात त्यांच्या कार्याचे किमान राजकारणच करू नका, हीच एकमेव इच्छा....👏😔* *सावित्रीमाईना त्यांच्या पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन💐💐*

🔥जय ज्योती,जय क्रांती…🔥
[10/03, 1:14 pm] Baldev Ade Sir Sanvidhan: सावित्रीबाई स्मृतिदिनानिमित्त लेख….

भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले


-डॉ. श्रीमंत कोकाटे *विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो,परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी,शाळा,महाविद्यालय सुरू केले का?कोणाला अध्यापन केल्याची नोंद आहे का?. तसा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही.सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती,त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता.* *सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल नितांत आदर आहे,परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दांपत्याने घातला.सावित्रीबाई फुले या भारतातील आद्य स्त्री शिक्षिका आहेत.त्यांनी सर्व जातीधर्मातील मुलामुलींना मोफत शिक्षण दिले.त्यांनी ब्राह्मण मुलींना देखील आनंदाने शिकवले.सावित्रीबाई फुले यांच्या काळात जर सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाईंनी सरस्वतीलासुद्धा शिकविले असते,इतक्या मोठ्या मनाच्या सावित्रीबाई होत्या.* *सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नेवसे पाटलांच्या कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्या जिज्ञासू होत्या.1840 साली त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याबरोबर झाला.जोतीराव फुले यांनी तत्कालीन अनिष्ट प्रथा नाकारून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले.फुलेंनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या कुटूंबापासून केली.या कार्याला जोतीरावांच्या वडिलांचा विरोध होता.जोतीराव फुले यांनी घर सोडले पण शिक्षण देण्याचे कार्य सोडले नाही.* *फुलेंनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरू केली.ही देशातील पहिली सार्वजनिक आणि मोफत शाळा आहे.त्या शाळेच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत.त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी अध्यापनाचे काम केले.* *ज्ञानाचे महत्त्व सांगताना सावित्रीबाई फुले लिहितात,*

“ज्ञान नाही,विद्या नाही।
ती घेणेची गोडी नाही।
बुद्धी असून चालत नाही।तयास मानव म्हणावे का?।”
मानव हा बुद्धी ग्रहण करण्यास लायक आहे, त्यामुळे त्याने ज्ञानार्जन केले पाहिजे, मानव जर ज्ञानार्जन करत नसेल तर त्याला मानव तरी का म्हणायचे? असा प्रश्न सावित्रीबाई फुले विचारतात. *सावित्रीबाई फुले यांनी मराठी भाषेचा कैवार घेतला. मराठीचा अभिमान बाळगला, परंतु इंग्रजी भाषेचा त्यांनी कधीही तिरस्कार केला नाही, याउलट इंग्रजी भाषेचे महत्व सांगणारी कविता त्यांनी लिहिली. त्या लिहितात,* *"इंग्रजी माऊली । इंग्रजी वैखरी ।*

शूद्रांना उद्धारी। मनोभावे ।”
इंग्रजी भाषेत शिक्षण घेतले तर तुमच्या पिढ्यानपिढ्याचे कल्याण होईल, असे सावित्रीबाई फुले यांचे मत होते.ते मत आज खरं ठरले आहेत.इंग्रजी भाषा शिकल्यामुळे अनेक लोक डॉक्टर, बॅरिस्टर, इंजिनिअर, वकील झालेले आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईना शिकविले. त्या देशातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना मोफत शिकविले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला. *सावित्रीबाई फुले यांनी केशवपन पद्धतीला विरोध केला. या अमानुष प्रथेविरुद्ध त्या लढल्या. सत्यशोधकांनी विधवा बालिकांचा आक्रोश कवितेतून पुढीलप्रमाणे व्यक्त केला आहे.*

“काहो आण्णा, मी तुमची लाडकी ।
का करिता मला बोडकी ।।” *सावित्रीबाई फुले या अत्यंत संवेदनशील, कारुण्यमय मनाच्या होत्या. त्यामुळे त्या अन्यायाविरुद्ध लढल्या.* *सावित्रीबाई फुले या प्रागतिक विचारांच्या होत्या. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, नवस सायास इत्यादी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला. त्या म्हणतात.* *"धोंडे मुले देती,नवसा पावती*

*लग्न का करती नारी नर **
नवसाने मुलं होत असतील तर मग लग्नाचीच गरज काय? असा सवाल सावित्रीबाई विचारतात. सनातनी व्यवस्थेला प्रश्न विचारायची हिम्मत त्यांच्याकडे होती. ही हिम्मत त्यांच्याकडे आधुनिक शिक्षणाने आलेली होती. *सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना करून निराधार महिलांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना मदत केली. गुंडांना पायबंद घातला. समाजातील. कर्मठ, सनातनी लोकांना त्या घाबरल्या नाहीत. धर्मांध लोकांना त्यांनी निर्भीडपणे प्रतिकार केला.* *सावित्रीबाई फुले आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. माहेरी गेल्यानंतर जोतिरावांना पाठवलेल्या पत्रात त्या म्हणतात "कांही वैरी विदूषक आपल्याला ठार मारण्यास टपलेले आहेत,पण त्यांच्या भीतीने आपण हे शैक्षणिक, समाज परिवर्तनाचे काम अर्ध्यावर सोडायचे नाही". सावित्रीबाई फुले यांच्या या भूमिकेतून त्यांचा निर्भीडपणा, हिम्मत आणि लढाऊ बाणा प्रकर्षाने दिसतो. त्यांनी महात्मा फुले यांना संकटसमयी प्रोत्साहन दिले, त्यांना नाउमेद केले नाही. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही.* *सावित्रीबाई माहेरी असताना त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थाना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माहेरी जाऊन त्या सुखात राहिल्या नाहीत, तर तेथे देखील त्यांनी प्रबोधन कार्य चालूच ठेवले.* *महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले.पती निधनानंतर सती न जाता त्यांनी निर्भीडपणे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेले. दत्तक पुत्र यशवंताला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले.* *सकाळी उठल्याबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करावे. त्यांचे दर्शन घेऊनच आपल्या दिवसाला सुरुवात करावी, असे सावित्रीबाई फुले एका काव्यातून सांगतात,*

“छत्रपती शिवाजीचे । प्रातःस्मरण करावे।
शूद्रादि अतिशूद्रांचा । प्रभू वंदू मनोभावे।”

महाराणी ताराराणी यांच्या कार्यकर्तृत्वाचा सावित्रीबाई फुले यांना मोठा अभिमान वाटत असे ताराराणीच्या कार्याची आणि शौर्याचे यथार्थ प्रदीर्घ वर्णन सावित्रीबाई फुले यांनी एका काव्यातून केले आहे.
” ताराबाई माझी मर्दिनी।
भासे चंडिका रणरागिणी
रणदेवी ती श्रद्धास्थानी।
नमन माझिये तिचिया चरणी।”

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्या संकटात डगमगल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली.सावित्रीबाई फुले लढणाऱ्या होत्या,रडणाऱ्या नव्हत्या.सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य आपल्याला हे सांगते की मुलगीसुद्धा वंशाला दिवा असते. *सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा एक अस्सल फोटो उपलब्ध आहे.यामध्ये सावित्रीबाई जोतीरावांच्या उजव्या बाजूला उभ्या आहेत. म्हणजे स्त्री ही दुय्यम दर्जाची नसून ती देखील हिम्मतवान,बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असते, हे जोतीराव फुलेंच्या नेणिवेतदेखील होते.* *सावित्रीबाई यांनी ते स्वकर्तृत्वाने दाखवून दिले,त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत.त्या केवळ पारंपारिक शिक्षिका नव्हत्या,तर त्या गुलामगिरी,अनिष्ट प्रथा, सनातनी गुंड,विषमता यांच्याविरोधात लढणाऱ्या लेखिका,कवयित्री आणि प्रबोधनकार होत्या.त्यांचा आज स्मृतिदिन,त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!*

-डॉ.श्रीमंत कोकाटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp