उदगीर / प्रतिनिधी :


दि.४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.लातूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले असता ४ दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन उपशिक्षणाधिकारी श्री.प्रमोद पवार साहेब यांनी दिले होते.परंतु अद्याप कसलीही कार्यवाही केली नाही.
भ्रष्ट अकार्यक्षम शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या हलगर्जीपणामुळे ५६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला उध्वस्त झालेली आहे. माननीय नामदार आदरणीय श्री. बच्चुभाऊ कडू (माजी शिक्षण राज्यमंत्री) यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता मौजे शेल्हाळ येथे जि.प.प्रा.शाळेत इयत्ता नववी आणि दहावी चे वर्ग अध्यापन करण्यासाठी आदेश फोनवरून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिले होते, परंतु शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे व सदरील शाळेतील शिक्षक यांनी एकमेकांचे हितसंबंध जपत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान केलेले आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जळकोट उदगीर विधानसभा अध्यक्ष सूर्यभान चिखले यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कार्यालय लातूर,जिल्हाधिकार्यालय लातूर, उपविभागीय शिक्षण लातूर यांना अर्जाद्वारे या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्यासाठी १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.