(१) आधुनिक इतिहिसलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये (१) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. (२) हे प्रश्न भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध
दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो.
(३) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते.
(४) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहास विषयात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो
पुढील प्रश्नासाठी Next Page वर Click करा
___________________________________________
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पपाट करा.
उत्तर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या ‘दास कॅपीटल’ या ग्रंथात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते
(१) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
(२) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरुपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
(३) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते.
पुढील प्रश्नासाठी Next Page वर Click करा