Maharashtra Agriculture Recruitment 2023: सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र कृषी विभागात २१०९ कृषिसेवक पदासाठी जागा निघाल्या आहेत.

Agriculture Recruitment Application Process : कृषी विभागात शासनाने तब्बल साडे तीन वर्षांनंतर कृषी सेवक पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आठही विभागांत ही पदभरती करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत. यामध्ये दोन हजार १०९ पदांसाठी ही भरती होईल. येत्या आठ ते दहा दिवसांत अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

कृषी विभागात क्षेत्रीय स्तरावर दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’ संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून सरळसेवेने भरण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात कृषी सेवकांच्या तब्बल दोन हजार ६३८ पदे रिक्त आहेत. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच जवळपास दोन हजार १०९ पदे भरण्यात येतील. ही पदे निश्चित वेतनावर भरण्यात येतील.

पात्र उमेदवारांनी www.krushi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन परिक्षा निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. अर्ज, त्याचा कालावधी, परिक्षेची तारीख आदीबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर दिली जाईल.

अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि क्षेत्रातील अशा दोन्ही प्रवर्गातील ही भरती होईल. कृषी सेवक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे आहे. या पदासाठी प्रतिमाह १६ हजार रुपये वेतन राहील. कृषी विषयामधील पदविका, पदवी आवश्‍यक राहील. परिक्षेचे स्वरूप हे २०० गुणांचे १४० वस्तुनिष्ठ आधारित प्रश्न असे आहे.

यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, कृषी विषय यावर आधारित प्रश्न असतील. भरतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपये, तर अमागासवर्गीय उमेदवारांसाठी १ हजार रुपये परिक्षा शुल्क आहे. नागपूर विभागात सर्वाधिक ४४८, तर लातूर विभागात सर्वात कमी म्हणजेच १७० पदे भरण्यात येतील.

विभागनिहाय रिक्त पदे व पद भरतीची संख्या :

विभाग—रिक्त पदे —पदसंख्या

ठाणे–३६८—२९४

पुणे—२३५—१८८

कोल्हापूर—३१३—२५०

नाशिक—४२०—३३६

अमरावती—२८४—२२७

औरंगाबाद—२४५—१९६

लातूर—२१३—१७०

नागपूर—५६०—४४८

एकूण—२६३८—२१०९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp