मौ.देवर्जन ता.उदगीर जि.लातूर येथे सोमवारी (ता.१८) खरिपातील सोयाबीन काढणीची सहावी महिला शेतीशाळा घेण्यात आली.

या वेळी महिलांना शेतातच सोयाबीनचे दर्जेदार बियाणे निर्मिती करत आसतांना काय दक्षता घ्यावी समजून सांगण्यात आले. त्याच बरोबर सोयाबीन काढणी करत आसतांना हातात खादीग्रामोद्योग निर्मित कापडी हातमोजे घालणे किंवा घरच्या घरीच जिन्सपैंटचे हातमोजे तयार करून कसे घ्यावे या विषयी सुद्धा माहिती सांगण्यात आले. आणि महत्त्वाचे म्हणजे शेतीशाळा FFS प्लौट आणी कंट्रोल प्लौट यातील सोयाबीन उत्पादन काढण्याचे प्रात्यक्षिक शेतकरी महिलांकडून करून घेण्यात आले.या शेतीशाळेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी पोकरा योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या उत्पन्नात वाढ करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा सल्ला पोकराचे प्रशिक्षक बि.आर.टाळीकोटे यांनी महिला शेतकऱ्यांना दिला.

या वेळी प्रगतशील शेतकरी ऐड.सुधाकर धोतरे, कृषीताई शाहू कांबळे,महिला शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp