दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती हे इंडिया आघाडीसोबत येणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द मायावती यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात वेगळंच समीकरण पहायला मिळणार आहे. (bsp chief mayawati tweets in interest of bahujan community BSP stands by its decision to contest lok sabha election on its own)

मायावती यांनी म्हटलं की, बसपा देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आपल्या स्वतःच्या जीवावरच दमदारपणे लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं आम्ही कोणाशी युती-आघाडी किंवा तिसरी आघाडी करण्याच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. (Marathi Tajya Batmya)

ही फेक न्यूज आणि चुकीची बातमी आहे. माध्यमांनी अशा प्रकारे खोडसाळ बातम्या देऊन आपली विश्वासार्हता गमावू नये, लोकांनी देखील सावध राहायला हवं. (Latest Marathi News)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp