NEET परीक्षेत रेणुका बदनाळेचे यश
तेली समाजाच्या वतीने सत्कार..
देवणी ( प्रतिनिधी ) …
कु. रेणुका शशिकांत बदनाळे हिने NEET परीक्षेत 625 गुण घेऊन सुयश मिळवले. त्यामुळे रेणुका बदनाळे ही शासकीय कोट्यातून मेडीकल प्रवेश पात्र झाली आहे. देवणी येथील सर्व सामान्य कुटुंबातील रेणुका हिने अतिशय परीश्रमाने हे यश मिळवले.
कु. रेणुका बदनाळे हिच्या यशाबद्दल विरशैव तेली समाज तालुका शाखा देवणीच्या वतीने रेणुका व तिच्या आई आणि वडिलांचा कृषीभुषण अमरनाथ मुर्के व मुख्याध्यापक सुनील क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास
विरशैव तेली समाज तालुकाध्यक्ष योगेश तगरखेडे, कार्याध्यक्ष अशोक कुमठे, उपाध्यक्ष अविनाश मुर्के, सचिव राजकुमार बदनाळे, कोषाध्यक्ष राजकुमार कलशेट्टी, राजेश मुर्के, संजय विश्वनाथे, आकाश चिल्लरगे, शंकर येड्डे गुरुजी, शिवराज बदनाळे, मनोहर बदनाळे, नागनाथ कळसे, वसंत पापणे आदी मान्यवर उपस्थित होते.