देवणी येथील शिवपार्वती मंदिरात मंगल दिनी शुभमुहूर्तावर हजारो भक्तांच्या उपस्थित विवाह सोहळा संपन्न झाला या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक शिवभक्त उपस्थित होते. या विवाहाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे मोठी यात्रा भरते त्याप्रमाणे कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ही यात्रा भरली आसल्याने यात्रेत हौसे,गौसे,नौसे मोठ्या प्रमाणावर दिसून आले.