महाराष्ट्र प्रदेश असंघटित कर्मचारी काँग्रेसच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी शेख सरदार यांची नियुक्ती
निलंगा / प्रतिनिधी : दिनांक 24/11/2025 रोजी निलंगा येथे आयोजित बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री अभय दादा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्या हस्ते कामगार क्षेत्रामध्ये करीत असलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन माननीय श्री सरदार शेख गुरुनाळकर यांची महाराष्ट्र प्रदेश असंघटित कर्मचारी काँग्रेसच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आणि निवडीचे पत्र माननीय जिल्हाध्यक्ष श्री अभय साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश असंघटित कर्मचारी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री राजकुमार होळीकर यांनी असंघटित कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर व त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना व तसेच केंद्र सरकारने केलेल्या कायद्याबद्दल आणि पुढे भविष्यात कामगाराबद्दल त्यांच्यासाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कसे कार्य करता येईल याचे भरीव मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा देऊन कामगारांच्या हितासाठी पावलोपावली माझी साथ राहील असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित श्री फिरोज शेख, श्री अंगद कांबळे, गुरनाळ गावचे चेअरमन श्री अंकुश बागवाले, श्री ए एम शेख रावणगावकर, आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते वेळेस जिल्हाध्यक्ष अभय दादा साळुंखे यांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्ते वेळेस समाजामध्ये बंधुत्व समता प्रेम आणि एकोप्याने सर्वांना संघटित करून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य कसे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले तसेच त्यांनी अशीही सांगितले की कार्यकर्त्यांना की आपण काम करते वेळेस जनतेच्या हिताचे कार्य केल्यास व करत राहिल्यास त्यासोबतच आपले हित आपोआपच होत असते या विचारधारेने काम करत राहावे आणि येणाऱ्या काळात काँग्रेसचे विचार आणि कार्य तळागाळातील जनतेच्या मनात रुजवण्याचे कार्य करावे तसेच या सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या अफवा आणि खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे म्हणून समाजात पेरणाऱ्या विविध गोष्टी तसेच समाजामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काँग्रेसच्या पारंपारिक प्रतिमेला कसल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये असे सूचित करून जनसामान्यांचे असंघटित कर्मचाऱ्यांचे आणि समाजातील गोरगरीब जनतेचे विविध पद्धतीने त्यांना योग्य ते सहकार्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे कार्य सतत करत राहावे यासाठी मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही देऊन अमूल्य मार्गदर्शन केले.







Leave a Reply