देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील गोविंद नागप्पा बिजापूरे (वय ८०) यांचे दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी, शुक्रवार सकाळी ११.१५ वाजता स्वगृही निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता त्यांच्या शेतामध्ये करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन सुना, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
गोविंद बिजापूरे हे वडार समाजातील प्रख्यात दगडी बांधकाम तज्ञ शिल्पकार होते. त्यांनी ग्रामीण भागासह कर्नाटक सीमाभागात अनेक ऐतिहासिक चिरेबंद बांधकामे, नक्षीकामे व मोठ्या विहिरींची निर्मिती केली. त्यांच्या कुशल हातांनी साकारलेल्या दगडी कलाकृती आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात.
तसेच ते एक पराक्रमी पैलवानही होते. इ.स. १९६५ मध्ये कर्नाटकातील नावाजलेले मल्ल पैलवान यांना “चारी मुंड्या चित” करण्यात त्यांनी यश संपादन केले होते.
अशा या बहुगुणी नक्षीदार कलावंत व कुशल पैलवानाच्या निधनाने वडमुरंबी परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या दगडी बांधकामाच्या अद्वितीय कलेची आणि कुस्तीतील पराक्रमाची आठवण पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.




Leave a Reply