
जिल्हा परिषद खरबवाडी गुरदाळ प्रा, शाळेत संविधान दिन संविधान शपथ घेऊन मोठ्या उत्साहात संपन्न
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा, शाळेत संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला, संविधान शपथ घेण्यात आली तसेच उद्देशिका पत्रिकेचे वाचन करण्यात आले,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बिरादार सर, सहशिक्षक बिरादार अंतेश्वर, पाटील श्यामला, त्यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच या शाळेत चित्रकला स्पर्धा शालेय विविध उपक्रम राबविण्यात आले तसेच संविधान दिनाबद्दल उद्देशिका पत्रिकेचे वाचन करण्यात आले बिरादार सरांनी संविधान दिल्याबद्दल सविस्तर माहिती दिली, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, सामाजिक कार्यकर्ते नरसिंग गायकवाड,रवी गुरधाळकर, विठ्ठल गायकवाड विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने होते



Leave a Reply