उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मातृभूमी प्रतिष्ठान कडून व्यसनमुक्तीची जनजागृती..


उदगीर शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार तालुका विधी सेवा समिती व मातृभूमी महाविद्यालय, कस्तुराबाई नर्सिंग स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश उदगीर डी.बी. म्हलाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यसनमुक्ती जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा तदर्थ न्यायाधीश वाय.बी.गमे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम एस एम वाय रचभारे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्हि.बी.कांबळे, कनिष्ठ स्तर न्यायाधीश के.ए.यादव, कनिष्ठ स्तर बी.आर. झेंडे, उदगीर तालुका विविध संघाचे अध्यक्ष आनंद मुंढे, उपाध्यक्ष गितानंद अक्कनगीरे, सचिव चंद्रशेखर भोसले यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश रे उस्तुरे याच्या मार्गदर्शनाखाली मातृभूमी महाविद्यालय व कस्तुराबाई नर्सिंग स्कुल संकुलाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पथनाट्यातून व्यसनमुक्ती जनजागृती करण्यात आली. यावेळी प्राध्यापक बिभीषण मद्देवाड यांनी “दार उघड सखे दार उघड, नवऱ्याची गडबड, जीवाची धडधड झाली ग बाई” या लोकगीताचे सादरीकरण केले. व्यसनाधिन झालेल्या व्यक्तीचे कुटुंब कसे उध्वस्त होते. व व्यसनाधीन व्यक्तींच्या जीवनात अशाप्रकारच्या अडचणी निर्माण होतात या पथनाट्यातून दाखवून दिले. यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी, पथनाट्य लेखन दिग्दर्शक बिभीषण मद्देवाड, उदयगिरी महाविद्यालयाचे प्रा गौहव जेवळीकर, निवृत्ती जवळे, किशोरकुमार सूर्यवंशी, विशाल बोडके ,नागेश सुळकेकर, दामिनी धनवे, क्रांती सुर्यवंशी यांच्यासह आदी विद्यार्थी कलाकार उपस्थित होते.
[] पहिला कार्यक्रम संपन्न, आणखीन चार कार्यक्रम करण्यात येतील
व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती व्हावी असे निर्देश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी एका याचिकेवर निर्णय देताना सांगितले आहे. त्या अनुषंगाने अमली पदार्थ सेवन करुन आपले आयुष्य उध्वस्त करणारे व अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार आपला उभं आयुष्य कारागृहात संपवली जात आहे. त्यामुळे व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती करुन व्यक्ती व्यसनाधीन होणार नाही. व एनडीपी सारख्सया गुन्ह्यात अडकणार नाहीत. त्यासाठी व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती व्हावी असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. त्या अनुषंगाने उदगीर येथे पहिला कार्यक्रम संपन्न झाला आणखीन चार कार्यक्रम करण्यात येतील.
न्यायाधीश डी.बी.मल्हाटकर
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उदगीर



Leave a Reply