ग्रामीण भागासाठी देवणी ता,अपघाताचे प्रमाण वाढले देवणी ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी–नगरपंचायत
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी : येथील ग्रामीण रुग्णालयात नवीन ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देवणी हा सीमावर्ती भागातील तालुका आहे. तालुक्यातून एक राज्यमार्ग आहे. येथे पशुधनाचा मोठा बाजार भरतो. बाजारात खरेदी-विक्रीसाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेशातून शेतकरी व गोपालक येतात. मात्र, तालुक्यात आरोग्यविषयक सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी लातूर, सोलापूर, हैदराबाद, पुणे येथे जावे लागते. परिणामी, उपचारास उशीर होतो तसेच तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गंभीर जखमींना वेळेवर उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहे.आर्थिक भार वाढतो.शहरात ग्रामीण रुग्णालय तर तालुक्यातील बोरोळ आणि वलांडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच जवळपास आठ उपकेंद्रे आहेत. या सर्व केंद्रांतील रुग्णांची संख्या पाहता येथे ट्रॉमा केअर सेंटर होणे अत्यंत गरजेचे आहे. ट्रॉमा केअर सेंटर नसल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. शिवाय सुविधांअभावी आरोग्य केंद्रातून प्रथमोपचार करुन रेफर केले जाते.येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यास सात-आठ वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील. तसेच अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे येथे लवकरात लवकर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.




Leave a Reply