देवणी तालुक्याच्यातील काही ठिकाणचे चित्र ; सार्वजनिक स्मशानभूमी अभावी रस्त्यालगत करावी लागते अंत्यसंस्कार..!

मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा एनगेवाडी,आजणी येथे स्मशानभूमीचा भयानक गंभीर प्रश्न?

देवणी : लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यात १४ गावांमध्ये नागरिकांची गैरसोय; जागा देण्याची मागणी‌ आधुनिक युगात ग्रामविकासाच्या नावाखाली अनेक योजना राबवल्या जात असल्या तरी देवणी तालुक्यातील वास्तव अजूनही वेदनादायक आहे. तालुक्यातील ४५ गावांपैकी १४ गावांमध्ये आजही स्मशानभूमी व जागाही उपलब्ध नाही. परिणामी मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार उघड्यावर, नाल्याजवळ किंवा शेताच्या बांधावर करावे लागतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.अनेक ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध नाही किंवा असली तरी मालकी हक्काचे वाद, सीमांकनाचे प्रश्न अशी आहे तालुक्यातील आकडेवारी देवणी तालुक्यातील ४३ गावांमध्ये स्मशानभूमी असून, स्मशानभूमी व जागेअभावी १४ गावांत अंत्यसंस्कार उघड्यावर होतात. शेडची सुविधा २५ गावांमध्ये असून ३२ गावामध्ये शेडच उपलब्ध नाहीत. ५७ गावामध्ये स्मशानभूमीत विद्युतीकरण, पिण्याच्या पाण्याची सोय अशा प्राथमिक सोबीसुविधांचा अभाव आढळून येतो. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी ४० गावात रस्ता असून तर १७ गावामध्ये रस्ताच नसल्याने पावसाळ्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. फक्त २ गावात संरक्षण भिंत असून ५५ गावामध्ये स्मशानभूमीला संरक्षण भिंत नाही.आणि शासकीय मंजुरीचा अभाव हे मोठे अडथळे ठरत आहेत. काही गावांतील नागरिकांनी अनेकवेळा तहसीलदार, पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे लेखी मागणी केली असली तरी आजपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी, ग्रामीण भागात मृतदेह वाहून नेण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी जागा मिळवणे ही लोकांची मोठी
समस्या बनली आहे. देवणी तालुक्यातील काही गावांत स्मशानभूमी असूनही तिथे मूलभूत सुविधा नाहीत. एकूण ३२ गावांत शेड नाही, त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कारावेळी पावसाचा त्रास आणि उन्हाळ्यात तीव्र ऊन सहन करावे लागते. वृद्ध आणि महिला वर्गाला ही वेळ त्रासदायक ठरते. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःच्या
जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक देवणी तालुक्यातील या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. स्मशानभूमीचा प्रश्न केवळ मृतांच्या नाही, तर जिवंत समाजाच्या संवेदनशीलतेचा आहे. त्यामुळे शासनाने या गावांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देऊन, जमिनीचे वाद निकाली काढून आणि आवश्यक सुविधा उभारून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी होत आहे.खचनि तात्पुरती शेड बांधली आहे, पण ती अपुरी आणि असुरक्षित आहे.याशिवाय, ५५ गावांमध्ये स्मशानभूमीला संरक्षणभिंत नाही. त्यामुळे मोकाट जनावरे, डुक्कर आणि कुत्र्यांमुळे परिसर अस्वच्छ राहतो. काही वेळा अंत्यसंस्कारानंतरही राख व अवशेष विखुरले जातात, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. ग्रामस्थांनी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी अनेक वेळा केली आहे. तालुक्यातील या वास्तवाने ग्रामीण विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळावा, हेच मानवी समाजाचे लक्षण आहे, आणि या दिशेने प्रशासनाने तातडीने पावले उचलणे हीच काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp