देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणावर निवडणुकी संदर्भात राजकीय सावट
देवणी : लातूर जिल्हा परिषद मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया चालू केल्या आहेत वलांडी जिल्हा परिषद गट खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत त्यामुळं लातूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वलांडी जिल्हा परिषद गटाला मिळू शकते मात्र आरक्षण जाहीर होऊनही कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणुकी संदर्भात रेलचेल दिसून येत नाही कोणत्याही राजकीय पक्षातील कार्यकर्ते यांनी निवडणुकी बाबत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणावर राजकीय सावट पसरले आहे राजकीय पक्ष जुन्या कार्यकर्ते यांना संधी देणार साम,दाम, दंड,भेद,घेऊन आलेल्या बाहेरील आयात केलेल्या उमेदवारांना देवणी तालुक्यातील मतदारावर लादून स्थानिकच्या कार्यकर्त्यांनां सतरंज्या उचलायला लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे देवणी पंचायत समितीचे सभापती पद हे खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित झाले आहे मात्र महिलाही या पदासाठी दावेदार असून शकते बहुतांशी हे सभापतीपद बोरोळ व वलांडी गणातून निवडून येणारा लोकप्रतिनिधी सभापती पदाचा दावेदार असू शकणार आहे सभापती पद हे प्रतिष्ठिचे पद असल्याने बोरोळ गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते गजानन गोविंदराव भोपनीकर आपले नशीब अजमावणार आहेत गजानन भोपनीकर या गणात लोकांचा संपर्क वाढविला असल्याचे दिसून येतआहेत तर वलांडी गणातून भारतीय जनता पक्षाचे देवणी पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर हे उमेदवार राहण्याची शक्यता आहे या बोरोळ व वलांडी वेगवेगळे गण असले हे गण सभापती पदाचे दावेदार असल्यामुळे दोन शिक्षण सम्राट या दोन वेगवेगळ्या गटात आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत बोरोळ जिल्हा परिषद गट हा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे भारतीय जनता पक्षाकडून तळेगावकर समर्थक माजी प्राचार्य गोपीनाथ सगर हे उमेदवार राहण्याची शक्यता आहेत तर काँग्रेस पक्षाने आपला पत्ता आणखीन ओपन केला नाही वलांडी जिल्हा परिषद गटासाठी विद्यमान सरपंच राणीताई भंडारे हया संभाव्य उमेदवार असू शकतात तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार गुलदस्त्यात आहे जवळगा जिल्हा परिषद गटात काँग्रेस कडून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर सेवानिवृत्त प्रा रामलिंग मूळे, तर भारतीय जनता पक्षाकडून धनेगावचे माजी सरपंच कुमार पाटील, रामलिंग शेरे किंवा इतर उमेदवार राहू शकतो असे असले तर देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणांत निवडणुकी संदर्भात निरुउत्वाह दिसून येत आहे या तालुक्यातील निवडणुकीवर राजकीय सावट दिसून येत आहे
गिरीधर गायकवाड



Leave a Reply