भाजपाच्या भव्य रॅलीत उत्स्फूर्त गर्दी; अध्यक्षांसह २० उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल

मुखेड | नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या या दिमाखदार रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

रॅलीच्या माध्यमातून उत्साहवर्धक वातावरण निर्माण करत भाजपच्या वतीने अध्यक्ष पदासह २० नगरसेवक उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज विधिवत भरण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

यावेळी आ. डॉ. तुषार राठोड, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते. रॅलीदरम्यान उमेदवारांचा उत्साह, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पक्षाचा ताकदवान जल्लोष यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची रंगत अधिक वाढली.

भाजपाच्या या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्ष दमदारपणे मैदानात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp