उदगीर : मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर तर्फे दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी “जागतिक मत्स्य दिवस” साजरा करण्यात आला. या निमित्ताने मत्स्यव्यवसायिक व शेतकऱ्यासाठी शासकीय मत्स्य बीज केंद्र घरणी, शिवपुर जि. लातूर येथे मत्स्य संवर्धनातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये अध्यक्षस्थानी श्री. शिरीष गाथाडे, प्रादेशिक उपायुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, लातूर, तसेच प्रमुख पाहुणे मत्स्य विज्ञान महाविद्यालय,उदगीर चे सहयोगी अधिष्ठाता, डॉ.बी.आर.खरटमोल हे उपस्थित होते. श्री.गाथाडे यांनी आपल्या भाषणात उपस्थीत मत्स्य व्यवसायिक व शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायाचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून व्यवसायात आर्थिक नफा मिळवण्याचे आवाहन केले. डॉ. खरटमोल यांनी मत्स्य व्यवसायासाठी लागणाऱ्या शास्त्रीय तंत्रज्ञानासाठी महाविद्यालयाची मदत घेण्याचे व व्यवसाय यशस्वी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना डॉ. अजय कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक यांनी केली व जागतिक मत्स्य दिवस साजरा करण्याचा उद्देश सांगितले. कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचे डॉ. एस.आर.यादव, प्राध्यापक व डॉ. एस.एन. कुंजीर, सहयोगी प्राध्यापक यांनी आधुनिक मत्स्य व्यवसाय या विषयावर व्याख्यान दिले. या प्रसंगी तेजस्वीनी कराळे, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, लातूर यांनी मत्स्य व्यवसायीकांना मत्स्य व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये उपस्थित मत्स्य व्यवसायिकांसाठी मत्स्यबीजांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रगतशील शेतकरी श्री. ओमकार मस्कले, श्री. गुंडेराव चौसष्टे व मत्स्य व्यवसायिक श्री. सावळकर, श्री. लक्ष्मण तिकटे, श्री. विनाय कांबळे, श्री. पंढरी वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील विविध मत्स्यमार सोसायटीचे अध्यक्ष व सभासदांच्या विविध शंकाचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. ए.टी. मरकड, डॉ. व्हि.बी. सुतार, डॉ. एम.एम. गिरकर व मत्स्य व्यवसाय विभाग लातूर येथील श्रीमती विद्या कोरे, श्रीमती मिना केंद्रे, श्रीमती शितल गिरकर, श्री. सय्यद हमजा, श्री. अजिंक्य देवकत्ते, मत्स्यबीज केंद्राचे श्री शेख इस्माईल होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्षन श्री. बाळासाहेब, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सगर यांनी केले. कार्यक्रम यषस्वी करण्यासाठी श्री बिरादार नितीन, श्री मादळे चंद्रकांत, श्री. चिमेगावे शिवा, श्री. रंगवाळ नरेश, श्री. पवार स्वप्नील, श्री भंडे व भांडकोळी यांनी अथक परिश्रम घेतले.
मत्स्य संवर्धनातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर शासकीय मत्स्यबीज केंद्र, घरणी शिवपुर येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न




Leave a Reply