मुखेड कौग्रेसमधे इच्छूक कोण.?


मुखेड काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील शेकडो ईच्छुक उमेदवारांसह समर्थकांची गर्दी

मुखेड /प्रतिनिधी : (एस.आर.टाळीकोटे) विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था जि.प.पं.स.नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मातोश्री मंगल कार्यालयात कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर होते तर प्रमुख उपस्थितीत जिल्ह्याचे खासदार प्रा.रविंद्रजी चव्हाण,मुखेड विधानसभा प्रदेश प्रभारी फरीदजी देशमुख,महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड, युवकांच नेतृत्व रामदास पाटील सुमठाणकर, जिल्ह्याचे निरीक्षक मा.उपमहापौर शमीम अब्दुला,गंगाधरराव सोंडारे,जिल्हाउपाध्यक्ष राजनजी देशपांडे,माजी जि प सदस्य चंद्रकांत घाटे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन माधवराव पाटील उन्द्रीकर,युवा नेते अभिजीत पाटील बेटमांगरेकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती शिवलींग पाटील कामजळगेकर,मजुर फेडरेशनचे संचालक शौकतखाँ पठाण या सर्वांचा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर व शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांनी सत्कार केला.
स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी मागण्यासाठी समर्थकासह गर्दी केली होती,यावेळी बोलताना माजी आमदार बेटमोगरेकर म्हणाले की, या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या निवडणुका पारदर्शक व नियोजनबद्ध घेतल्या जातील काँग्रेस पक्षाची ताकद कार्यकर्त्यांच्या पाठीशी लावण्याचे अभिवचन दिले व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कोअर कमीटी प्रमुखपदी ग्रामीण भागासाठी राजन देशपांडे तर शहरासाठी डॉ.श्रावण रॅपणवाड यांची नावे घोषीत केली.काँग्रेस पक्षात नुकतेच प्रवेशित असलेले लिंगायत समाजाचे नेते व तरुणांच्या मनगटात बळ उभ करणारे रामदास पाटलांनी तर आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना व नेत्यांना भाऊक साद घालुन पक्ष वाढीसाठी आहोरात्र काम करणार असल्याचे सांगितले.
शहरातील सामान्य मानसांच्या विश्वासावर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवु व काँग्रेस पक्ष मजबुत करण्याच्या दृष्टीने युवकांची ताकद येणाऱ्या काळात महत्वाची असल्याचे डॉ.रॅपणवाड यांनी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारवर सडकुन टिका केली,हे सरकार जातीयवादाला खतपाणी घालण्याच काम करून धर्मा-धर्मात दरी निर्माण करीत आहे सामान्य नागरीकांना,सर्व समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपणा सर्वांना काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे रहावे लागेल म्हणजेच येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडणून आणण्याचे आश्वासीत केले.
या आढावा बैठकीत मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य संघटकपदी सय्यद शादुल महेबुब पटेल यांची निवड करण्यात आली तर फुले नगर भागातील पांडुरंग अडगुलवार व शंकरराव चौडेकर यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी केल्यामुळे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.ग्रामीण व शहरी भागातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारी मागनीसह प्रत्येकांनी आपले मनोगत व्यक्त करून उमेदवारीची मागणी केली.
यावेळी तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा चिटणीस विश्वंभर पाटील मसलगेकर, अच्युत पाटील बिल्लाळीकर,पंचायत समीतीचे माजी सदस्य शिवाजीराव पाटील जुन्ने बेळीकर, दिगांबरराव सोमवारे,भिमशक्तीचे युवानेते आकाश कांबळे बेळीकर,धनराज पाटील बेटमोगरेकर,जिल्हा सेवादल उपाध्यक्ष विद्याधर अण्णा साखरे,के.एच.हसनाळकर,माली पाटील बेटमोगरेकर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,संदीप पाटील ईटग्याळकर,जांब नगरीचे बाळासाहेब पुंडे,युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगीळे,शरद पाटील आंबुलगेकर,मारोती पाटील मटके,सचिन पाटील राजुरकर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षअखील येवतीकर,युवक काँग्रेस सचिव तुकाराम सुडके येवतीकर,युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले,मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष बालाजी साबणे, अल्पसंख्यांक विभागाचे इमराण पठाण, ओ.बी.सी.सेलचे शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका अध्यक्ष रफीकभाई बामणीकर,तालुका सचिव बालाजी देशमुख भाटापुरकर,वसु पाटील येवतीकर,मैनुभाई येवतीकर,काँग्रेस सरचिटणीस रामेश्वर पाटील इंगोले,शहर उपाध्यक्ष बालाजीराव वाडेकर, शिवाजी गायकवाड,कांग्रेस सोशल मिडीया शहराध्यक्ष केतन मामडे,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,व्ही.आर.शेख,भानुदास पाटील बेटमोगरेकर,संदीप पिल्लेवाड,विठ्ठलराव पंदीलवाड,रमजान सौदागर, विशाल गायकवाड,मारोती गायकवाड कलंबरकर सर, बालाजीराव कोल्हे, शिवकुमार चोंडीकर,प्रकाश इंगळे,मारोती घाटे,सय्यद मुजिप,हाफीज पठाण सह शहरातील व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची, इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती.आढावा बैठकीचे सुत्रसंचलन जिल्हा युवक काँग्रेसचे आकाश पाटील उन्द्रीकर यांनी केले, प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर यांनी तर काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांनी मान्यवरासह सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp