रस्त्यासाठी आत्मदहन..???

घरासाठी रस्ता द्यावे या मागणी करिता आत्मदहनाचा प्रयत्न

वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पूर्वीच्या तहसीलदाराने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी न झाल्याने निवेदनकर्त्यावर आत्मदहनाची वेळ

देवणी तहसील प्रांगणात
आत्मदहण्याचा प्रयत्न

देवणी येथे उपचार करून पुढील उपचाराकरिता उदगीर येथे हलवण्यात आले.

देवणी : तालुक्यातील हेळंब येथील सिद्धेश्वर कणजे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद केल्याने त्यांच्या तक्रारीवरून देवणी तहसीलदारांनी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी न झाल्याने सोमवारी (दि.२४ ) निवेदनकर्त्यांनी देवणी तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाच्या प्रयत्न केला. आत्मदहन करताना त्यांना गंभीर ईजा झाल्याने त्यांना देवणी येथे उपचार करून पुढील उपचाराकरिता उदगीर येथे पाठविण्यात आले.
याबाबत आत्मदहनकर्त्यांनी देवणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या मालकीचा ताब्यातील घर सर्वे नंबर ५७ असून सदर घरासाठी जाण्या येण्याकरिता सर्वे नंबर ५४ व ५७ मधून रस्ता गेल्याने तहसीलदारांकडे रस्ता खुला करण्याचा अर्ज केले होता.
त्यानुसार सदरील प्रकरणावर दि. २४ डिसेंबर २०२४ रोजीच्या निकालानुसार सर्वे नंबर ५४ व ५७ मधून रस्ता खुला करण्याचा तहसीलदारांचा आदेश पारित करण्यात आले.
या निर्णयाचे अंमलबजावणी करण्याकरिता
बऱ्याच वेळा तहसीलदाराकडे गेले असता तहसीलदार हे मंडळ अधिकारी यांच्याकडे जाण्यात सांगितले तर मंडळ अधिकारी हे तहसीलदारांकडे जाण्यास सांगत होते .
तहसीलदार व मंडळ अधिकारी वारंवार यांना टाळाटाळ करत असल्याने या तहसीलदारांच्या कार्यभारास कंटाळून सदर घरच्या रस्ता खुला होत नसल्याने अखेर निवेदनकर्ता सिद्धेश्वर बसलिंग कणजे रा.हेळंब यांनी दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवेदन देऊन योग्य कारवाई करून रस्ता खुला करून न दिल्यास दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार सिद्धेश्वर बसलिंग कणजे यांनी सोमवारी (दि.२४) देवणी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये डिझेल अंगावर टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांच्या तोंडात व कमरेस गंभीर इजा झाली.त्यांना पोलीस व महसूल प्रशासनाकडून देवणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर पुढील उपचाराकरिता उदगीर येथील
शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.
फोटो 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp