लातूर विभागीय दिवाळी अंक स्पर्धाअखिल भारतीय मराठी पञकार परिषदेचा उपक्रम…


उदगीर , (प्रतिनिधी )
: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतिने मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर विभागीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला मातृभुमी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सतिष उस्तुरे यांच्या तर्फे प्रथम पारितोषिक ५०५१ रुपये रोख व सन्मानचिन्ह ( कै.)मल्लीकार्जुन हवा यांच्या स्मृती पित्यार्थ संपादक सुनिल हवा यांच्या वतिने तर्फे द्वितीय पारितोषिक ३०५१ रुपये रोख व सन्मानचिन्ह , ( कै. )स्वातंञ्य सैनिक भगवानराव रोडगे यांच्या स्मृती पित्यार्थ संपादक माधव रोडगे यांच्या तर्फे तृतीय पारितोषिक २०५१ रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात येतील.स्पर्धेत भाग घेणार्‍यास सहभाग प्रमाणपञ देण्यात येणार आहे.
दिवाळी अंकात कथा ,कविता , व्यंगचित्र, यांचा समावेश असावा. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या लातूर विभागातील लातूर ,नांदेड ,हिंगोली , धाराशिव या जिल्हातील संपादक, प्रकाशकांनी दिवाळी अंकाच्या दोन प्रती व प्रवेश शुल्क रु.१००/- रोख दिनांक १० नोहेंबर २०२५ पर्यंत
स्पर्धा समन्वयक बिभीषन मद्देवाड लोकाक्षर न्युज कार्यालय जुने ग्रामिण पोलीस ठाण्यासमोर
नांदेड रोड ,सोमनाथपूर उदगीर जिल्हा लातूर -४१३५१७ संपर्क क्रमांक ९८२३१६०५५२
या पत्त्यावर अंक पाठवावेत, असे आवाहन संयोजक सचिन शिवशेट्टे लातूर विभागीय सचिव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद , बिभीषन मद्देवाड ,जिल्हा अध्यक्ष डिजिटल मिडीया परिषद ,लातूर , श्रीनिवास सोनी ,अध्यक्ष उदगीर जिल्हा मराठी पञकार परिषद ,सुनिल हवा सचिव , उदगीर जिल्हा मराठी पञकार परिषद , सिद्धार्ध सुर्यवंशी जिल्हा सचिव : डिजिटल मिडीया परिषद , अर्जुन जाधव ,तालुका समन्वयक पञकार विरोधी हल्ला कृती समिती यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp