- Home
- लिंगायत महासंघाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत 31आक्टोबर रोजी लातुरात महत्वाची बैठकलातूर-लिंगायत महासंघ शाखा लातूरच्या वतीने. वार शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता लिंगायत महासं घाच्या लातूर शहरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मीटिंग बिडवे कॉम्प्लेक्स राजीव गांधी चौक लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या संपूर्ण मतदारसंघातील समाजाच्या अडचणींवर चर्चा जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकेत लिंगायत समाजाचे नगरसेवक वाढवायची चर्चा ,तसेच अहमदपूर नगराध्यक्षपदी लिंगायत समाजाचा उमेदवार असला पाहिजे , उदगीर नगर परिषदेवर लिंगायत समाजाची महिला निवडून आली पाहिजे, तसेच निलंगा नगराध्यक्षपदी सुद्धा लिंगायत समाजाचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला पाहिजे यासाठी काय करता येईल.तसेच उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या पक्षातूनच उमेदवारी कशी मिळेल यावर सविस्तर या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. यामीटिंगला मार्गदर्शन करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिराजदार हे उपस्थित रहाणार आहेत., जिल्हाध्यक्ष करीबसवेश्वर पाटील, जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, लातूर तालुकाध्यक्ष भीमाशंकर ढेकणे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पाटील भडीकर, लिंगायत महासंघाचे चाकुर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे गुरुजी, अहमदपूर तालुका अध्यक्ष शिवकुमार होळदांडगे,यांच्यासह शहराध्यक्ष शिवदास बुलबुले मार्गदर्शक नागनाथ अप्पा भुरके सिद्राम आप्पा पोपडे , माणिकराव कोकण, उमाकांत किडींले लिंगायत महासंघाचे प्रदेश सहसचिव विश्वनाथप्पा मिटकरी, लिंगायत महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष माणिकप्पा मरळे सहकोशाध्यक्ष शिवदास लोहारे मार्गदर्शक गुंडू ब्रह्मावाले गुरुजी आधी उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व तालुक्यांत अशा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व पदाधिकारी व सदस्य मंडळींनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील यांनी केले आहे.



Leave a Reply