अखेर पिसाळलेला लांडगा (सिरस)..

पंचायत समिती देवणी परिसरात व देवणी तालुका परिसरामध्ये देवणी खुर्द बोरोळ शिवारात कोल्हा सारखा प्राणी चावा घेतांनाच्या थरारक घटना…

अखेर त्या कोल्हा सिरस टेम्पोच्या धडकाने जखमी होऊन मृत्यू

आज बोरोळ सिंधीकामठ रस्त्यावर चार जणांचा चावा घेऊन टेम्पोच्या धडकने जखमी अवस्थेत सापडला,

देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी — सिरम लसचा तुटवडा असल्याने जखमींना उदगीर रुग्णालयात हलवले देवणीत वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात पाच जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक देवणी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवणी शहरात शुक्रवारी दुपारी एका भयानक घटनेने हादरले. पंचायत समिती आणि स्टेट बँक परिसरात दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एका वन्य पशुने अचानक हल्ला चढवून परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. क्षणार्धात पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.in देवणी शहरातील नदी काठी असलेल्या परिसरात एका वन्य पशुने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ३ वर्षीय इनाया इस्माईल मल्लेवाले, ५ वर्षीय फैजान फिरोज येरोळे, ५५ वर्षीय चनप्पा राचनप्पा भद्रशेट्टे, ५५ वर्षीय गोविंद माणिकराव म्हेत्रे आणि २५ वर्षीय फेमुनिया काजी हे गंभीर जखमी झाले. सर्वांना तातडीने देवणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आवश्यक सिरम लस उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचारानंतर सर्वांना उदगीर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा प्राणी नेमका कोणता याची वन विभागाच्या वतीने माहिती घेण्यास सुरूवात झाली असुन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांचा रोष… वनविभाग बेजबाबदार घटनेनंतर नागरिकांचा रोष वनविभागावर उसळला आहे. कारण देवणी शहरात वनविभागाचं कार्यालयच नाही. संपूर्ण कारभार निलंगा येथून चालवला जातो. कर्मचारी वर्षातून एकदा ध्वजवंदनासाठी येतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. एवढ्या गंभीर घटनेनंतरही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल येत असल्याने लोकांत संताप व्यक्त होत आहे.
लांडगा की कोल्हा? अजून निश्चित नाही कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे स्पष्ट झालेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. काहीजणांच्या मते तो लांडगा असावा,तर काहीजणांना तो कोल्हा वाटतो. मात्र आताच निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आणि वनविभागाची संयुक्त गस्त सुरू आहे. श्रीमती बर्डे, वनपरिमंडळ अधिकारी, देवणी जखमींमध्ये 3 वर्षांच्या बालकांसह वृद्धांचा समावेश भरदिवसा शहर हादरले । प्राण्याचा शोध सुरू भरदिवसा अशा प्रकारे वन्य पशुचा हल्ला झाल्याने देवणीकर भयभीत झाले. हल्ल्यानंतर काही वेळातच रस्ते ओस पडले, दुकानांची शटरं खाली आली. काही नागरिकांनी घाबरून घराबाहेर पडणे टाळले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र नदीकाठचा अंधार आणि झुडपी परिसर यामुळे शोधमोहीम अडचणीत आली आहे.एकाचा कान तुटला, डोळ्यावर जखम एकाच्या डोळ्याजवळ खोल जखम आहे, तर दुसऱ्याचे कान तुटले आहेत. अनेकांच्या डोक्याचे, हाताचे आणि पाठीचे लचके घेतले आहेत. आमच्याकडे सिरम लस उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी रुग्णांना आम्ही उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे. डॉ. शैलजा पुरी, वैद्यकीय अधिकारी, देवणी रुग्णालय नागरिकांत भीती, प्रशासनावर प्रश्नचिन्ह ! देवणी सारख्या गजबजलेल्या शहरात दुपारच्या वेळी असा हल्ला होणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे परिणाम असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. वनविभागाच्या निष्क्रियतेवरून सर्वसामान्यांपासून स्थानिक जनप्रतिनिधींपर्यंत संताप व्यक्त होत आहे. या घटनेने देवणी शहरात वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींचा नागरिकांनी गंभीर इशारा दिेले होते अखेर कोल्हा सिरस प्राणी बोरोळ रस्त्यावरती चार जणात चावा घेऊन टेम्पोच्या धडकेने जखमी व मृत्यू झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp