🪯 गुरुनानक जयंती-५ नोव्हेंबर २०२५..🪯

गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. त्यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तलवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो..
गुरुनानक जयंतीच्या दिवशी शीख समुदयातील लोक गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरुनानक देव यांच्या शिकवणीचे स्मरण करतात. म्हणून या दिवसाला गुरु पर्व आणि गुरु नानक प्रकाश उत्सव म्हणूनही ओळखले जाते. यावर्षी गुरु नानक देव यांची ५५६ वी जयंती साजरी केली जाणार आहे..
गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते..
ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या..
सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली.गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती.. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते.. *म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती..
हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.
त्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले.
त्यांच्या शिकवणीमध्ये देव, सत्य आणि सेवा या गोष्टींवर जोर दिला गेला..
गुरुनानक देव यांची शिकवण
शिख धर्मातील लोक गुरुनानक यांना नानक, नानकदेव, बाबा नानक आणि नानक शहाजी या नावाने ओळखतात. गुरु नानक देव यांनी एक ओंकार म्हणजेच एक देव असा संदेश दिला होता. या दिवशी शिख धर्मातील लोक रॅली काढतात, गुरुद्वारांमध्ये कीर्तन आणि लंगरचे आयोजन करतात. शीख धर्मातील लोक हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करतात..
देव पिता एक आहे..
नेहमी एका देवाची उपासना करण्यावर लक्ष केंद्रित करा.
देव जगात सर्वत्र आणि प्रत्येक जीवात उपस्थित आहे..
भगवंताच्या भक्तीत लीन झालेले लोक कोणाला घाबरत नाहीत.
प्रामाणिकपणा आणि मेहनतीने पोट भरले पाहिजे..
वाईट गोष्टी करण्याचा किंवा कोणालाही त्रास देण्याचा विचार करू नका..
तुम्ही नेहमी आनंदी राहावे, नेहमी स्वतःसाठी देवाकडे क्षमा मागावी..
तुमच्या मेहनतीने आणि प्रामाणिक कमाईने गरजूंना मदत करा..
प्रत्येकाकडे समानतेने पहा, स्त्री आणि पुरुष समान आहेत..
शरीर जिवंत ठेवण्यासाठी अन्न आवश्यक आहे. पण लोभासाठी साचवण्याची सवय वाईट आहे..



Leave a Reply