मुखेड प्रतिनिधी

तालुक्यातील समाजकारण, शैक्षणिक प्रगती आणि सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे का. चेअरमन गोविंदराव माणिकराव भद्रे यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्त आज भद्रे परिवारातर्फे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला सुपुत्र अँड. तथा पत्रकार नवनाथजी भद्रे, प्रा पि. जी भद्रे, स्नुषा चंद्रकला भद्रे, शिलाबाई भद्रे, नातू संघशिल भद्रे, सुमेध भद्रे, संघर्ष भद्रे, युवा नेते बंटी भद्रे, सिध्दार्थ सोनकांबळे, मंगलदिप सिताफुले यासह नात जावई राणी धम्मदिप गायकवाड यासह आदि नातेवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात फोटोपूजनाने व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. तद्नंतर भद्रे परिवाराच्यावतीने व्यक्त करण्यात आलेल्या भावनिक संदेशात म्हटले की, “बाबांच्या स्मृती आमच्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहेत. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालत समाजाच्या विकासासाठी आम्ही काम करत राहू असे म्हणाले”.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.



Leave a Reply