लातूर |
समाजातील गरजू, पण शिक्षणाची ओढ असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उभारी देण्याच्या उद्देशाने दिशा प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने ११ विद्यार्थ्यांना एकूण ₹२,१४,५००/- रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले.

सध्याच्या काळात अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत दिशा प्रतिष्ठानकडून या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काकरिता मदतीचा हात देण्यात आला. हा उपक्रम संस्थेच्या “एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये” या मूलभूत हेतूचा एक भाग आहे.
या मदतीचा लाभ घेणारे विद्यार्थी
पठाण मोहम्मद तलाफ फिरोज, स्वप्निल प्रशांत निंबुर्गे, अनिकेत अजय पांढरे, वडजे सार्थक दत्तात्रय,
श्रावणी संभाजी खंदारे, श्रीकांत सतीश गदगे, सूर्यवंशी ओमकार विजय, गोरे अभिजीत नवनाथ, शिवम कृष्णाप्पा खडके, बालाजी चोकोटे, प्राजक्ता तानाजी बिराजदार
या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवेश शुल्काकरिता दिशा प्रतिष्ठानकडून धनादेश स्वरूपात मदत देण्यात आली.
धनादेश वितरणाचा कार्यक्रम प्रतिष्ठानचे मार्गदर्शक संचालक अभिजीत देशमुख, संतोष देशमुख, चाकोते अप्पा, दत्तात्रय पाटील, केऊर कामदार, रईस खान, शशी माने, संजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी मार्गदर्शक अभिजीत देशमुख, संतोष देशमुख, दत्तात्रय पाटील व शशी माने यांनी मनोगत व्यक्त करत दिशा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे आणि शैक्षणिक बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की,
“दिशा प्रतिष्ठान समाजातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणे, हाच आमचा उद्देश आहे.”
समाजातील शैक्षणिक प्रगतीसाठी दिशा प्रतिष्ठान सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. शिक्षण, आरोग्य क्षेत्रात संस्थेची कार्यशैली उल्लेखनीय ठरत आहे.
क्रीडा संकुल येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी केले.
सूत्रसंचालन संचालक इसरार सगरे यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली यादव यांनी केले.



Leave a Reply