देवणी प्रतिनिधी.
देवणी येथे येत्या सोमवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी ऑल टेन्ट.डीलर्स वेल्फेअर आरोग्यनायझेशन महाराष्ट्र देवणी तालुका मंडप असोशियन तर्फे लातूर जिल्हास्तरीय देवणी मिनी एक्सपो व भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील जेष्ठ उद्योजक मल्लिकार्जुन मानकरी हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून असोसिएशनचे चेअरमन ऑल इंडिया तथा महाराष्ट्र अध्यक्ष रामकिशन दडूशेठ पुरोहित हे राहणार आहेत याप्रसंगी येथील मठाधीश श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम होत आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सोमनाथ वाडकर. विजयसिंह परदेशी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी. सागर भाई प्रल्हाद चव्हाण चेअरमन महाराष्ट्र कोल्हापूर व कृष्णात अक्कनगिरे जिल्हा अध्यक्ष लातूर मंडप असोसिएशन. सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड आणि नगराध्यक्ष डॉक्टर कीर्तीताई संजय घोरपडे तसेच माजी नगराध्यक्ष वैजनाथ अश्टुरे यांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच असोशियन चे उदगीर तालुका अध्यक्ष आयुब भाई पठाण जळकोट अध्यक्ष सोमनाथ फुलारी अहमदपूर अध्यक्ष गुरुनाथप्पा सोलपुरे चाकुर अध्यक्ष विठ्ठल सुतार शिरूर अनंतपाळ अध्यक्ष काशिनाथ गोणे रेनापुर अध्यक्ष विश्वनाथ पुणे औसा अध्यक्ष सिद्धेश्वर सुरवशे निलंगा अध्यक्ष दिलीप मिनियार हे उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देवणी तालुका मंडप असोशियन तर्फे करण्यात आले आहे.




Leave a Reply