उदगीर शहर व ग्रामीण भागातील जनतेस आवाहन..
सर्वाना नमस्कार व कळविण्यात येते कि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ना.अजितदादा पवार साहेब हे दि.30/10/2025 रोजी उदगीर शहरात….डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणासाठी उदगीरात येत आहेत..त्यांचेसोबत इतरही मान्यवर येत आहेत…ना.अजितदादा पवारसाहेब यांना Z+अशी सुरक्षा असलेने उदगीरचे वाहतुक व्यवस्थेत खालील बदल करण्यात येत आहे….
1..उदगीर येथुन लातुर..अहमदपूर कडे जाणारे सर्व बसेस या दि.30/10/2025 रोजी सायंकाळी पाच वाजलेपासुन बीदर रोड बायपास वरुन जातील
2.अहमदपूर कडून येणारे बसेस व इतर वाहने यांना बसस्थानक किंवा बीदरकडे जायचे असल्यास..उमा चौकातुन नळेगाव रोडला जावून बायपासवरुन बीदर रोडने उदगीरमधे यावे
3.उमा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा सायंकाळी सहा वाजलेपासुन रात्री दहापर्यत ,अँम्बुलन्स व फायरब्रिगेड या वाहनाशिवाय इतर सर्व वाहनासाठी बंद असेल
4 सह्याद्री हाँटेल..रेमंड शोरुम..पत्तेवार चौक…चौबारा रोड पोलीस ठाणे समोर…दवाखाना रोड…या अंतर्गत रोडवरुन नांदेड बीदर या मुख्य रोडवर वाहनांना येता येणार नाही..
5.मुख्य रोडवरील सर्व व्यापारी यांनी आपले दुकानातील सामान रोडवर ठेवू नये व आपले वाहनांची पार्कीग रोडवर करु नये…
6 जि.प मैदानावर फुटपाथवार भरत असलेली मिनी चौपाटी सदर दिवशी भरणार नाही.संबधिताने आपले हातगाडे तेथून काढून घ्यायचे आहेत…
7 पोलीस ठाणे ते मोंढा रोड या रोडवर असलेली वाहने संबधितानी काढून घ्यावीत
8 जयजवान चौक येथील हाश्मी खानावळ…एवन चहा…सम्राट हाँटेल समोरील रोड हा मोकळा राहिल यांची त्यानी खबरदारी घ्यायची आहे..
9.सभेसाठी येणारी गर्दी पाहता तहसील कार्यालय ते पोलीस ठाणेपर्यत रोडवर एकही हातगाडा…फळविक्रेते याःनी रस्त्यावर दुकाने टाकून अडथळा निर्माण करु नये
10…नगरपरिषदेसमोर रोडवर भाडे मिळण्यासाठी उभी असलेल्या कारचालकांनी तेथे वाहने एका दिवसासाठी तेथे उभा करु नयेत..
11 नागरिकांनी सायकाळी सहा ते रात्री दहा या काळात मुख्यरोडवर वाहनासह येवू नये.सदर भागातील प्रवास टाळावा…
12.या कार्यक्रमासाठी येणारे वाहनासाठी पार्कीग व्यवस्था ही श्री हावगीस्वामी यात्रा मैदान…दुधडेआरी…सोमनाथपूर…बुद्धविहार समोरील पटांगणात करण्यात येत आहे….
सदरचा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पाठवावा म्हणजे त्यांची गैरसोय टळेल….
सर्वानी वरील वाहतुक बदलाचे पालन करुन सहकार्य करावे……
पोलीस निरीक्षक उदगीर शहर/ग्रामीण….जयहिंद



Leave a Reply