नार्को टेस्ट म्हणजे काय..

एखादे गंभीर प्रकरण घडल्यास किंवा एखादा मोठा गुन्हा घडल्यास आपण बरेचदा ऐकतो, वाचतो की नार्को टेस्ट करा नार्को टेस्ट झाली पाहिजे, नार्को टेस्ट म्हणजे काय ते आपण सविस्तर पाहू..

  • Narco Test किंवा Narco Analysis ही एक वैज्ञानिक तपास पद्धत आहे त्या तपासामध्ये संशयित व्यक्तीला एक विशिष्ट औषध दिले जाते, ज्यामुळे ती व्यक्ती अर्ध-बेहोशीच्या (semi-conscious) अवस्थेत जाते आणि त्या स्थितीत ती सत्य बोलते असा विश्वास असतो. यालाच नार्को टेस्ट असे म्हणतात..
  • बरेचदा ही टेस्ट पोलीस तपासात (Criminal Investigation) संशयिताकडून माहिती मिळवण्यासाठी वापरली जाते, परंतु न्यायालयीन पुरावा म्हणून तिचे महत्त्व खूप कमी आहे. 1) नार्को टेस्ट म्हणजे काय..

नार्को टेस्ट म्हणजे अशी एक वैज्ञानिक तपास पद्धत आहे ज्यामध्ये संशयित व्यक्तीला “सोडियम पेन्टोथॉल (Sodium Pentothal)” हे औषध दिले जाते, ज्यामुळे तो व्यक्ती अर्ध-बेहोशीच्या (Semi-conscious) अवस्थेत जातो आणि त्या स्थितीत तो सत्य बोलतो असा विश्वास असतो. आणि ही चाचणी फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ (Forensic Psychologist) आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केली जाते.

2) ही चाचणी कशी केली जाते..

ही टेस्ट करण्यासाठी संबंधित न्यायालयाची कायदेशी परवानगी घ्यावी लागते, न्यायालयाची परवानगी घेऊनच (Court Order) मिळाल्यानंतर ही टेस्ट केली जाते.

संशयिताचे आरोग्य तपासूनच त्याला ते औषध दिले जाते, नंतर औषधामुळे तो झोपेसारख्या स्थितीत जातो,
त्या वेळी त्याला गुन्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात, त्याने बोललेले सर्व संभाषण ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड केले जाते.

3) नार्को टेस्ट दरम्यान नेमके काय होते..

व्यक्तीचे “Conscious Mind” दबले जाते आणि “Subconscious Mind” सक्रिय होते.

त्यामुळे ती व्यक्ती प्रश्नांना प्रामाणिक उत्तर देऊ शकते.

मात्र तिच्या उत्तरात कल्पना, स्वप्न, किंवा चुकीची माहिती असण्याची शक्यता असते.

म्हणून ही चाचणी पूर्ण सत्य उघड करतेच असे नाही.

4) भारतात नार्को टेस्ट कायदेशीर आहे का..

जबरदस्तीने (Compulsory) नार्को टेस्ट करणे बेकायदेशीर आहे.

पण स्वेच्छेने (Voluntarily) दिलेल्या संमतीने आणि न्यायालयाच्या परवानगीने ही चाचणी करता येते.

ही माहिती पुरावा म्हणून ग्राह्य नाही, परंतु तपासासाठी दिशा देणारी ठरते.

5) न्यायालयाचे मत..

Selvi vs. State of Karnataka (2010) 7 SCC 263
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की

नार्को टेस्ट पॉलीग्राफ आणि ब्रेन मॅपिंग चाचणी कोणत्याही व्यक्तीवर तिच्या इच्छेविरुद्ध केली जाऊ शकत नाही.

  • निर्णयातील प्रमुख मुद्दे:
  1. ही जबरदस्ती Article 20(3) (Self-incrimination विरुद्ध हक्क) आणि Article 21 (जीवन व स्वातंत्र्याचा हक्क) चे उल्लंघन आहे.
  2. चाचणी फक्त स्वेच्छेने संमतीने केली जाऊ शकते.
  3. या चाचणीतून मिळालेली माहिती थेट पुरावा नाही, पण तपासासाठी उपयोगी “Lead” ठरू शकते.

6) नार्को टेस्टचा तपासात उपयोग कसा होतो..

संशयिताने लपवलेली माहिती किंवा ठिकाणे शोधण्यात मदत होते,सहअभियुक्तांचा शोध घेता येतो,तपासाची दिशा स्पष्ट होते,मात्र कोर्टात आरोप सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र पुरावे आवश्यक असतात.
✍️ तुमचाच,
ॲड. आविनाश चिकटे
जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे
WhatsApp: 9923237287

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp