भाजपाचे नवे प्रदेश कार्यालय ठरणार कार्यकर्त्यांचे खरे ‘घर’..!

मुंबई : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते काल दिनांक 27 ऑक्टोंबर 2025 रोजी मुंबईत ‘भाजपा प्रदेश कार्यालय’, चे भूमिपूजन संपन्न झाले.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमितभाई शाह यांनी पक्षसंघटनेला नवी दिशा दिली आणि प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय उभारण्याचा संकल्प केला.
कार्यकर्त्यांसाठी हे कार्यालय फक्त इमारत नसून त्यांच्या निष्ठेचे, समर्पणाचे आणि सेवाभावाचे प्रतीक आहे.

2014 मध्ये अमितभाई शाह यांनी याच मुंबईतून निवडणुकीचे नेतृत्व केले, त्यावेळी छोट्या कार्यालयात बसून निवडणुकीचे काम पार पाडले, त्याचवेळी मोठ्या कार्यालयाचे स्वप्न पाहिले होते, लाखो कार्यकर्त्यांचे ते स्वप्न आज साकार होऊ लागले आहे.

नव्या कार्यालयासाठीची ही जागा भाजपने खरेदी केली असून इमारतीच्या परवागन्या पारदर्शकतेने, नियमांचे पालन करून मिळवल्या आहेत, हे कार्यालय कार्यकर्त्यांच्या योगदानाने उभारले जाणार आहे.

सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यालयाच्या बांधणीसाठी आपल्या क्षमतेनुसार समर्पण निधी द्यावा, जेणेकरून कार्यालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल. भाजपाची कार्यसंस्कृती म्हणजे पारदर्शकता आणि सेवा. हे कार्यालय त्या मूल्यांचेच प्रतिबिंब ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp