मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण,समाज, राष्ट्र घडवण्याचे कार्य केले – सिनेअभिनेते अनिल मोरे
लातुर –
भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त जयक्रांती महाविद्यालय येथे सहारा एज्युकेशन वेलफेयर फाऊंडेशन द्वारे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षणरत्न व सेवारत्न पुरस्कार वितरण सोहळा सिनेअभिनेते अनिल मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रा.गोविंद घार, विधीतज्ञ पवन निकम, सलीम आळंद हाजी मोहम्मद, पत्रकार अब्दुल समद शेख, संयोजक अजमत खान यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करतांना सिनेअभिनेते अनिल मोरे म्हणाले की, मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण,समाज, राष्ट्र घडवण्याचे कार्य केले.
तसेच राष्ट्र व देश एकसंघ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारांची आज खरी गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भारतीयांच्या हितासाठी कार्य केले आहे.
यानंतर शिक्षक महिला व पुरुष यांना शिक्षणरत्न व सेवारत्न पुरस्कार अभिनेते अनिल मोरे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजमत खान यांनी केले तर सूत्रसंचालन सलीम आळंद हाजी मोहम्मद यांनी केले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण,समाज, राष्ट्र घडवण्याचे कार्य केले – सिनेअभिनेते अनिल मोरे









Leave a Reply