विदारक चित्र…
मुखेड :
सगळ्यांना असं वाटतं की,अतिवृष्टीचे पैसे सर्वच शेतकऱ्यांच्या खातात पडले. सरकारनं तर दिवाळीपूर्वीचं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचं आश्वासन दिलं होतं.
पण,अजून एकही हप्ता खात्यात न पडलेल्या शेतकऱ्यांच्या या रांगा मुखेड तहसील कार्यालयात लागल्या आहेत.
काही शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते (पहिला 8500 व दुसरा 10000) पडले. पण,काही शेतकऱ्यांना अजून एकही हप्ता पडला नाही. त्या शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयात यवढ्या रांगा आहेत.तर गावा गावात असे कितीतरी शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित असतील,तश्या तक्रारीही येत आहेत.
आज,तहसीलमध्ये तक्रार घेवून आलेल्या शेतकऱ्यांची यादी करून तहसीलदार साहेबांना दिली.त्यासाठी त्यांनी 7 दिवसाचा वेळ मागितला आहे. त्या वेळेत पैसे जमा झाले नाहीत तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रस्त्यावर आल्याशिवाय प्रर्याय नाही.
अतिवृष्टीच्या मदतीसाठी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर यायची वेळ प्रशासनाने येऊ देऊ नये.केवळ प्रसारमाध्यमात मदत दिली असे चित्र उभा करून चालत नाही.तर सरकारने,प्रत्यक्ष बाधित सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत मिळेप्रयन्त लक्ष ठेवलं पाहिजे.
कारण,मदत मिळायला वेळ झाला कि,ती मदत पुन्हा मिळत नाही.ते पैसे जातात कुठे? त्यांनाच माहित? गेले वर्षीची मदत अजून मिळाली नाही,अश्या शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आहेत.तो ही प्रश्न सुटला पाहिजे.
#शेतकरी #अतिवृष्टी #अनुदान #NDRF #farmer
शिवशंकर पाटील कलंबरकर
(मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना)









Leave a Reply