
देवणी
आमचा उमेदवार आमच्यातलाच असावा” — सामान्य मतदाराची हाक लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही…लोकशाही म्हणजे विश्वास, नातं आणि लोकांच्या हृदयात जागा बनवलेली माणसं.स्थानिक स्वराज संस्था या लोकशाहीच्या मुळाशी आहेत —इथे जनता आणि कार्यकर्ता रोज भेटतो, संवाद करतो, एकत्र लढतो,पण जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा अनेकदा त्या जनतेशी जोडलेल्या माणसाला बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जाते —आणि तेव्हा मनात प्रश्न उठतो — “आमचा आवाज ऐकणारा कोण?”गावातील रस्ते, शाळा, वीज, पाणी, दवाखाना, शेतकऱ्यांच्या अडचणी,हे सगळं ज्याने आपल्या घरासारखं जपलं — तो कार्यकर्ता.लोकांच्या आनंदात, दुःखात, उत्सवात, संकटात ज्याने सोबत उभं राहिलं — तोच आमचा माणूस.आम्ही मतदार म्हणून एवढंच म्हणतो “आमचा उमेदवार आमच्यातलाच असावा.जो आमचं दु:ख जाणतो, आमच्या मातीचा आहे, आमच्यात वाढलेला आहे — त्यालाच संधी द्या.”
राजकीय समीकरणं, शिफारसी, आणि बाहेरचं बळ यापेक्षा
जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्याची नाळ यांना अधिक महत्त्व दिलं पाहिजे.स्थानिक स्वराज संस्था या लोकशाहीचा पाया आहेत.जर या पायावर बाहेरचं दगड ठेवला, तर रचना डळमळेल;पण जर आपल्या मातीचं विट बांधली, तर ही लोकशाही अढळ उभी राहील.म्हणून आज प्रत्येक मतदाराचं एकच आवाहन “मतदार सांगतील त्याकार्यकर्त्याला संधी द्या!”“स्थानिक माणसालाच प्रतिनिधित्वाची जबाबदारी द्या!”आपल जागरूक युवक मतदार*स्थानिक स्वराज संस्था. यामध्ये असणं गरजेचं आहे आपलाच बांधव पत्रकार लक्ष्मण रणदिवे देवणी



Leave a Reply