ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया कटिबद्ध : शाखाधिकारी विवेक करपे

१०७ व्या स्थापना दिनानिमित्त ग्राहक मेळावा संपन्न
उदगीर / प्रतिनिधी
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये देशात ०५ व्या. स्थानावर असलेली युनियन बँक ऑफ इंडिया चौफेर प्रगती करत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा देण्यात कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडियाच्या उदगीर शाखेचे शाखा अधिकारी विवेक करपे यांनी केले. बँकेच्या १०७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ग्राहक मेळाव्यात श्री.करपे बोलत होते. बँकेच्या स्थापनेविषयी सांगताना ते म्हणाले की, बँकेची स्थापना ११ नोव्हेंबर १९१९ रोजी झाली. शेट सिताराम पोतदार हे प्रर्वतक होते. मुख्यालयाच्या इमारतीचे उद्घाघाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते १९२१ मध्ये झाले.
आज बँकेच्या ८६०० हून अधिक शाखा आहेत. ९००० हून अधिक एटीएम, २५ हजाराहून अधिक बीसी पॉईंट्स, ७५ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. बँकेच्या प्रगती विषयी श्री.करपे यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२५ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय २२.०९ लाख कोटी आहे. यामध्ये १२.३४ लाख कोटींच्या ठेवीवर ९.७५ लाख कोटींचे कर्ज वितरण आहे. बँकेचा शाखा विस्तार परदेशात देखील असून हाँगकाँग येथे ३, दुबई इंटरनेट नॅशनल फायनान्शियल सेंटर व सिडनी ऑस्ट्रेलिया येथे प्रत्येकी १, अबुधाबी येथे प्रतिनिधी कार्यालय, लंडन, मलेशिया आधी ठिकाणी शाखा विस्तार आहे.
अशा या गौरवशाली १०७ वर्षांची परंपरा असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या प्रगतीमध्ये सर्व खातेदार, ग्राहक, कर्जदार, अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्याचे यावेळी श्री.करपे म्हणाले.
१०७ व्या स्थापना दिनानिमित्त उदगीर येथे आयोजित ग्राहक मेळाव्यामध्ये भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाचे सचिव एम नागाराजू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते व्यवसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या युनियन बीझ या मोबाईल ऍपचे तर रिटेल ग्राहकांसाठी युनियन इझ या मोबाईल ऍपचे लॉन्चिंग करण्यात आले. याच बरोबर देशातील ५१ नवीन शाखांचे ऑनलाईन उद्घाघाटन एम.नागाराजू यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अहिल्यानगर एमआयडीसी नागापूर येथील शाखेचा समावेश आहे. विकसित भारत २०४७ या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास देखील एम. नागाराजू यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अहिल्यानगर व उदगीर जिल्हा लातूर येथील ग्राहक मेळाव्याच्या वेळी तसेच उदगीर येथील शाखेत करण्यात आले. यावेळी क्षेत्रप्रमुख श्री. सुनील कुमार यादव, उप क्षेत्रप्रमुख श्री. अमित कुमार सिन्हा, उप क्षेत्रप्रमुख श्री. सुभाष गजभिये, शाखाधिकारी श्री. विवेक करपे यांसह उपशाखा प्रमुख श्री. सोमनाथ गुट्टे, ऋण अधिकारी श्री. दत्तात्रय शिंदे व सर्व कर्मचारी, प्रतिष्ठित ग्राहक श्री. अशोक बाहेती, श्री. रमेश बारोळे, श्री. राजकुमार पाटील, श्री. संदेश पेन्सलवार, श्री. संदीप मुक्कावर, श्री. अनिल मुंगिलवार, श्री. महेंद्र हुडे, श्री. ईश्वर महाजन, श्री. महेश पाटील, श्री. गंगाधर चिमणचोडे, श्री. माधव कुंभार, श्री. बालाजी ऐनापुरे, श्री. विष्णु अर्धवाड, श्री. सुधाकर यांजने, श्री. सूरज नावंदर, श्री. पापालाल बियाणी, श्री. ढोले साहेब पंचायत समिती, इतर ग्राहक, शुभचिंतक, कर्जदार, खातेदार व मान्यवर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply