जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन…

नांदेड : सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले पिक व उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

1️⃣ काढणीस आलेले सोयाबीन पिक शक्य तितक्या लवकर काढून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावे.
2️⃣ थ्रेशिंगचे काम (दाणे काढणी) हवामान पाहून करावे; पावसाची शक्यता असल्यास टाळावे.
3️⃣ उघड्यावर ठेवलेले सोयाबीन दाणे किंवा झडपी पिक ताडपत्री, प्लास्टिक शीट किंवा पॉलिथिन कव्हरने झाकून ठेवावेत.
4️⃣ ओलसर दाणे साठवू नयेत; पूर्ण वाळवूनच साठवण करावी.
5️⃣ साठवलेला शेतमाल उंच जागी व हवेशीर ठिकाणी ठेवावा.
6️⃣ विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असल्यास शेतात काम टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp