बाज्या वाजल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही — डॉ आर एस देवणीकर

देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणीचा भूमिपुत्र महाराष्ट्राचे प्रख्यात वक्ते, झुंझार व अभ्यासू व्यक्तीमत्व मातंग समाजाचे भूषण मा.डाॅ.आर एस देवणीकर यांचे नागपुर येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य सम्मेलनात समाजावरील अत्यंत प्रभावी प्रखर व अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृह अक्षरशः दणाणून गेले त्याची एक झलक म्हणजेच समाज परिवर्तनासाठी आपण रस्त्यावर उतरावा लागेल असे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय
साहित्य संमेलनातून उद्देशून बोलताना डॉ,आर एस देवणीकर म्हणाले की‌ आजची परिस्थिती काय आहे मागचा इतिहास वाचून पहा म्हणजे आपला समजेल ‌ ही सर्व महामानवाने ज्या पद्धतीने संघर्ष केला ती संघर्ष करणं आजच्या काळाची गरज आहे प्रबोधनातुन करा चळवळीतून करा साहित्यातून करा‌ वास्तव काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करावे अशी प्रतिपादन केले यावेळी या कार्यक्रमास मंत्री मा,आतिषजी जैयस्वाल, पद्यश्री नामदेव कांबळे, बार्टीचे व आर्टीचे महासंचालक श्री सुनीलजी वारे, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा,श्री मच्छिंद्र सकटे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे, जेष्ठ विचारवंत प्रा, माधवराव गादेकर, नागपूरचे डेप्युटी कमिशनर श्री प्रदीपजी बोरकर, अनेक सामाजिक कार्यकर्ते व संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp