७ नोव्हेंबर “विद्यार्थी दिवस म्हणजे काय सहशिक्षक लक्ष्मण मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,

देवणी लक्ष्मण रणदिवे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आज रोजी म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी सातारा येधील प्रतापसिंह भोसले हायस्कूल येथे पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता, त्यांचा हा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे.त्यानिमित्य देवणी खुर्द येथील जि.प. प्रा. शाळेत डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोरे एल. व्ही यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्तव सांगितले.बाबासाहेबांच्या आचारा-विचारातून, त्यांच्या गुण वैशिष्ट्यांचा वापर आपण विद्यार्थ्यांनी जीवनात आणावा असे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी. आरोग्य सेविका नारंगवाडे सिस्टर,अंगणवाडी ताई दैवशाला कांबळे, सौ. सरोजाताई रणदिवे आशाताईं शोभा रणदिवे, सहशिक्षिका शिक्षक शालेय समितीचे सर्व पदाधिकारी महिला पुरुष यावेळी उपस्थित होते,



Leave a Reply