उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा गटाचे आमरण उपोषण
लातूर :
जिल्हाधिकारी कार्यासमोर देवणी शहर प्रमुख दीपक स्वामी मळभगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस, त्या उपोषणासाठी लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संतोष सोमवंशी यांनी दिली भेट,
लातूर देवणी शहरातील नगरपंचायत सन २०२२ पासून- देवणी नगर पंचायतला विविध विकास कामांसाठी निधीची पूर्तता झाली मात्र, कामानुसार निधी खर्ची झाला की नाही, याबाबत प्रत्येकाच्या मनात संभ्रमता आहे. निधी खर्चाबाबतचा कोणताच अहवाल सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कामात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत झालेल्या कामांची चौकशी करुन अहवाल सादर करावा या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) गटाच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.देवणी नगर पंचायतीच्या माध्यमातून लोकप्रतिनीधींनी केलेल्या कामात अपहार झाल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) गटाचे शहरप्रमुख दिपक स्वामी मळभगे यांनी केला आहे. शासनाकडून मंजूर झालेला निधी, वार्डनिहाय झालेला खर्च, याकरिता नगरपंचायतीने घेतलेले ठराव, प्रोसिडींग बुक, ऑडीट रिपोर्ट व झालेल्या खर्चाची माहिती देणे बंधनकारक असतानाही याकडे नगर पंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. विकास कामांच्या ठिकाणी झालेला खर्च व इतर बाबींच्या माहितीसाठी फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणीची पूर्तता झाली तरच कामातील नियमितता समोर येणार आहे. विविध मागण्या घेऊन शिवसेना (उबाठा) गटाकडून सोमवार (दि. १०) पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.




Leave a Reply