

भोपणीकर परिवाराकडु आकाश म्हेत्रे यांचा सत्कार
देवणी :-
तालुक्यातील बोरोळ येथील म्हेत्रे आकाश नामदेव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून वर्ग -१ पदाला गवसणी घातली आहे, आकाश यांच्या आईवडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मोलमजुरी करून त्यांना शिक्षण दिल…..सोबतच हे यश मिळवण्यामध्ये त्यांना त्यांच्या मोठ्या भावांचाही सदैव पाठिंबा राहिला.सध्या ते राज्यकर निरीक्षक म्हणून माझगाव ,मुंबई येथे कार्यरत आहेत.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेतून झालेलं असून महाविद्यालयीन शिक्षण विवेक वर्धीनी विद्यालय, देवणी येथे झालं आहे.त्यांचा स्पर्धा परीक्षांचा प्रवासही अतिशय प्रेरणादायी राहिलेला आहे.तब्बल ३१ वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अपयश येऊनही न खचता अविरतपणे त्यांनी प्रयत्न चालू ठेवले आणि अखेर राजपत्रित अधिकारीपद मिळवलं.या यशाबद्दल आकाश म्हेत्रे आणि अश्विनी गंगाधर कोयले ही B. A. M. S. ला अहिल्यानगर येथे लागल्याने भोपणीकर परिवाराकडुन दोघांचे पण सत्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते गजानन भोपणीकर, देवणी नगर पंचायतीचे सदस्य प्रा.अनिल इंगोले, कै. रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत जावळे पाटील, उपप्राचार्य शिवाजी सोनटक्के, गावातील जेष्ठ उद्योजक कालीदास देवणे, उद्योजक दत्ता हुरुचनाळे, शालेय समितीचे अध्यक्ष सत्यदेव गरड, लक्ष्मण बिरादार, श्रीकांत बिरादार, ओम पवळे, सचिन मुळखेडे सह अदिंची उपस्थिती होती.




Leave a Reply