वलांडी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिक कर्जाचे व्याज पर्तव्याची 21 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

वलांडी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिक कर्जाचे व्याज पर्तव्याची 21 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वलांडी शाखेच्या अंतर्गत एकूण दहा गावे असून या दहा गावातील 980 पीक कर्ज शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले असल्याने या 980 पीक कर्ज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 लाख रुपये व्याज परताव्याच्या पोटी त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. वलांडी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत वलांडी सह परिसरातील दहा गावातील शेतकऱ्यांनी या बँकेमार्फत पीक कर्ज घेतले होते, त्यात धनेगाव, लमानी तांडा, हेळंब, टाकळी, देवगड, कोरेवाडी,
बोंबळी खु बोंबळी बु वलांडी, अनंतवाडी, दरेवाडी, इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी पीक कर्ज म्हणून कर्ज घेतले होते त्यात 980 पीक कर्जदारांनी आपल्या व्याजासह पीक कर्ज नूतनीकरण करून घेतले असल्याने या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या नूतनीकरणापोटी 11 कोटी रुपये वसुली झाली आहे. ही वसुली सन 2024-2025 या वर्षाची आहे. केंद्र शासनाने या पीक कर्ज शेतकऱ्यांच्या व्याज परताव्याच्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील 3% टक्के प्रमाणे 21 लाख रुपये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे, तर राज्य शासनाच्या 3% टक्के पीक कर्ज व्याज पर्तव्याच्या रकमेची मातृ शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांना 0% टक्के व्याजदरावर पीक कर्ज देण्याची घोषित केले असल्याने ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज घेतले आहे त्या शेतकऱ्यांनी बँकेच्या आर्थिक वर्षापूर्वीच कर्जाचे नूतनीकरण करून पीक कर्जाचे व्याजासह रक्कम बँक खात्यात जमा करून पुन्हा पीक कर्ज घेऊन त्याचे नूतनीकरण केल्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येकी 3% टक्के प्रमाणे त्यांची कर्जावरील व्याज परतावा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करत आहे. मात्र कर्जमाफीच्या आवास्यापोटी बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे नूतनीकरण करून चालू बाकी दार न होता थकबाकीदार शेतकरी होणे हे फायदेशीर आहे अशी समज असल्याने काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नोंदणीकरण न करता थकबाकीदार कर्जदार म्हणत आहेत. बँक परिसर गावातील शेतकऱ्यासह बँक खातेदारांना शाखा व्यवस्थापक लोखंडे, शाखा तपासणी भोळे, गट सचिव शेंडगे, गटचिव शेख यांनी ग्राहकांना व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी व पीक कर्ज वसुलीची मोहीम राबवून उत्तम कार्य करून सेवा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp