तलाठी धनराज सिताराम कुंभार यांचे अपघातात निधन

देवणी लक्ष्मण रणदिवे

आमचे सहकारी मित्र कै. धनराज कुंभार यांचा काल रात्री आठ वाजता कवठा पाटील जवळ निलंगा येथील निवडणुकीचे कामकाज करून घराकडे जाते वेळेस अपघात झाला त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल लातूर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली .अचानक झालेल्या अपघातात आपला सहकारी व मित्र धनंजय कुंभार
आपल्यातून निघून गेल्याची बातमी अतिशय मन हेलावणारी आहे.त्यांच्या आनंदी स्वभावाने, मदतीस तत्पर असलेल्या वृत्तीने आणि प्रामाणिक कार्यनिष्ठेने
ते सर्वांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण करून गेले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि दु:खाच्या या कठीण प्रसंगीत्यांच्या कुटुंबियांना धैर्य व सामर्थ्य मिळो—हीच प्रार्थना. त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या गावी सांजा सारोळा तालुका उस्मानाबाद होणार आहे तरी लातूर जिल्ह्यात निलंगा निटूर सज्जा,व देवणी खुर्द ता, देवणी सज्जा या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नोकरीला होते नंतर हे निलंगा येथे निटूर सज्जाला नोकरीला कार्यरत होते परिसरामध्ये सुद्धा यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp