मा. श्री ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी देवणीकर, दि. 12/10/2025 रोजी लातूर येथे राज्यस्तरीय साहीत्य सारथी समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत
श्रमीक हक्क अभियान समाजसेवक, संस्था चालक, संघटना प्रमुख, राष्ट्रीय डायरेक्टर ते राष्ट्रीय अध्यक्ष, अनेक पुरस्कार प्राप्त तथा साहीत्य सारथी समाज रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ज्ञानेश्वर भाऊ सुर्यवंशी देवणीकर विश्वसामाजीक मंच, श्रमीक हक्क अभियान महाराष्ट्र सलग्न नॅशनल दलित मानवी हक्क अभियान भारत, राष्ट्रीय सामाजीक न्याय आंदोलन, राष्ट्रीय कष्टकरी संघटना,महाराष्ट्र सामाजीक मंच,मराठवाडा एनजीओ फोरम, संविधान संवर्धन समिती यासह अनेक सामाजीक संस्था, संघटना, शासन, प्रशासना सोबत राहुन केलेल्या त्यांच्या निष्ठा आणि निस्वार्थ समाजसेवेस प्रभावीत झालेला जनसमान्यातील, गौरवशाली, गरीबांचा वाली, कुशल संघटक, मुस्तदी, संघर्षशील लोकनेता म्हणुन जिवनपट सांगताना ते म्हणतात.
पण………..
रक्ताचा रंग मात्र……..
अजुनही लालच…..
करा यावर मात……
”मणुष्य हीच खरी आपली जात “
नाहीतर देश जाईल धुळखात
भारतीय हीच आपली जात

माणसा माणसा जागा हो संविधानाचा धागा हो जीवनभर अविरत सांगण्याचे प्रामाणीक पणाचे कार्य व मानवी हक्काच्या साठी अन्न ,वस्त्र, निवारा, शिक्षण,रोजगार,पाणी,रस्ते,विज,आणि आरोग्य या मूलभुत प्रश्नाच्या सोडवणुकीचे अन्याय अत्याचाराच्या मुक्तीच्या व निर्गुणाच्या साठी मानवी अत्याचार पिडीतांना, निर्वासीतांना, निराधारांना, श्रमीक कष्टकरी, शेतकरी, भुमीहीन, शेतमजूर,गायराण धारक, गावठाण धारक, बेघर धारक या सर्वांना मरणोत्तर स्मशानभुमी शांतीपुर्ण अनंतात विलीन होण्यासाठी पवीत्र स्मशानभुमी जागा मिळविण्यासाठी म्हणुन स्मशानभुमीच्या जागेसाठीची आंदोलने करुन त्या प्रश्नांसह मानवांना मुलभुत सुख सोयी सुवीधा संवीधानीक मुलभुत हक्कासाठी अविरत कार्यकर्ता म्हणुन अनेक पुरस्कार प्राप्त ते समाभुषण ते समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त होणे व पूढील जिवणात अनेक पुरस्काराच्या नावनोंदणीत राज्यासह राष्ट्रीय स्तरावरील समाजरत्न म्हणुन दि. 12/10/2025 रोजी जय क्रांती महाविद्यालय भव्य सभागृहात साहीत्य सारथी कलामंचच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचीत्य साधुन राज्यस्तरीत मराठी साहीत्य संमेलन 2025,कवी संमेलन,गझल,मुशायरा सन्मान सोहळयात मा. श्री ज्ञानेश्वर भाऊ सुर्यवंशी देवणीकर यांना साहीत्य सारथी समाज रत्न पुरस्काराने उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते गौरवीण्यात आले. मा. जयप्रकाशजी दगडे, संपादक दै.नवराष्ट्र, मा.श्री भारतजी सातपुते, सुप्रसीध्द कवी व वात्रटिकाकार, मा.श्री संतोषजी सोमवंशी लातूर जिल्हा प्रमुख उबाठा., मा. श्रीमती दिपाली आवटे जिल्हा महिला आघाडी राष्ट्रवादी विकास लातूर,मा.श्री विवेकजी सौताडेकर इतीहास अभ्यासक व साहीत्य सारथी कलामंच अध्यक्ष, पदाधीकारी तथा आयोजक संस्थापक श्री सुरेशजी धोत्रे, अध्यक्ष गंगाधरजी डिगोळे, उपाध्यक्ष शादुलजी बौडीवाले, कार्याध्यक्ष गणेशजी परले, कोषाध्यक्ष श्री शिवशंकर बलुले, पुणे शाख अध्यक्ष प्रशांतजी पाटोळे, यांच्यासह अन्य कलावंत,कवी,साहीत्यीक,सामाजीक मान्यवर डॉक्टर, वकील आदींच्या उपस्थितीत आयोजीत समारंभात गौरविण्यात आले.



Leave a Reply