


देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी:-देवणी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाची बैठक जिल्हाध्यक्ष मा. सुधाकर दाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये नूतन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली व निवडीचे पत्र देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे .अध्यक्ष अंकुश गायकवाड बोंबळीकर, उपाध्यक्ष अंकुश बागवाले गुरनाळ, संगमेश्वर पत्री देवणी .राम बिरादार चवनहिप्परगा .सचिव रामराव बिरादार भोपणीकर. सहसचिव अभंग सूर्यवंशी आंबेगाव. कोषाध्यक्ष उत्तम मोरे हेळंब, महिला प्रतिनिधी सौ उषाकिरण बिराजदार हंचनाळ, देवणी शहराध्यक्ष अजय शिंदे .
राज्याध्यक्ष मा.डी एन पाटील साहेब यांनी दूरध्वनीवरून बैठकीस मार्गदर्शन केले व नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष संतोष धुमाळ जिल्हा सचिव इंद्रजीत यादगिरे उदगीर तालुकाध्यक्ष रंजीत पाटील, निलंगा शहराध्यक्ष हाजी चाऊस, दुकानदार संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा सल्लागार मा. शंकर अण्णा हुडे हे उपस्थित होते. या बैठकीसाठी रास्त भाव दुकानदार श्री राजकुमार साबणे, रामदास बनसोडे, बाबासाहेब वाघमारे, महेश जाधव, विलास कदम, राघवेंद्र जाधव, गोपाळ कारभारी, शिवानंद स्वामी, विनोद बिरादार, प्रभाकर माने शंकर बिरादार , रोहित पडसलगे, पांडुरंग चामले. एम के तेलंग, बंकटराव तुरेवाले , संजीव बिरादार सौदागर शेळके आदी उपस्थित होते